Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून आंबेगावातील सोसायटीमध्ये गुंडांचा धुडगुस; महिला जखमी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून आंबेगावातील सोसायटीमध्ये गुंडांचा धुडगुस; महिला जखमी

Pune Crime News | Bharti Vidhyapeeth Police Station – Gangsters break into society in Ambegaon due to previous enmity; Woman injured

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून गुंडांच्या टोळक्याने सोसायटीत शिरुन तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. सुदैवाने त्याने तो वार चुकविल्यानंतर त्याच्या आईला मारहाण (Beating) केली. तसेच सोसायटीतील जिन्याचे रिलिंगची तोडफोड केली.

याप्रकरणी पोर्णिमा रामदास माने (वय ४२, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रेम अंकुश शिंदे (Prem Ankush Shinde), सनी सोमनाथ सिंग (Sunny Somnath Singh), करण पटेकर, गणेश बाबु ओव्हाळ ऊर्फ भावड्या (Ganesh Babu Oval alias Bhavdya), भिमश्या सुरेश चव्हाण (Bhimshya Suresh Chavan) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव बुद्रुकमधील हरणाई कॉम्प्लेक्समध्ये (Harnai Complex, Ambegaon Budruk) शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा चंद्रकांत माने याचे आरोपीबरोबर पूर्वी भांडण
झाले होते. फिर्यादी हे त्यांच्या मुलाबरोबर रात्री नवले हॉस्पिटल (Navale Hospital) येथे जाण्याच्या तयारीत
असताना आरोपी दोन दुचाकीवरुन त्यांच्या सोसायटीत आले. प्रेम शिंदे याने चंद्रकांत माने याच्या डोक्यात
धारदार हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केला. तो त्याने चुकविल्याने तो वार हा सोसायटीमध्ये असलेल्या
सभासदांच्या नावाच्या बोर्डावर लागला. आरोपींनी स्वत: बरोबर आणलेल्या दारुच्या मोकळ्या बाटल्या व
दगड चंद्रकांत याला फेकून मारले. हा प्रकार पाहून फिर्यादी व त्यांची मुलगी भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आल्या.
तेव्हा आरोपींनी त्यांना वाईट शिवीगाळ करुन जिन्यातील रिलिंगचे नुकसान करुन घरदार संपून टाकेन अशी
धमकी दिली. या प्रकारात फिर्यादी या जखमी झाल्या असून पोलीस उपनिरीक्षक कर्चे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Bharti Vidhyapeeth Police Station – Gangsters break into society
in Ambegaon due to previous enmity; Woman injured

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून आंबेगावातील सोसायटीमध्ये गुंडांचा धुडगुस; महिला जखमी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article