Header

Pune Crime News | दुर्देवी ! येरवडयातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

Pune Crime News | दुर्देवी ! येरवडयातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

Pune Crime News | Very Sad ! Youth dies after drowning in swimming pool in Yeravada

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडयातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारातील जलतरण तलावात (Swimming Pool In Yerwada) बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यत करण्यात येत आहे. (Pune Crime News)

शिरीष पंडित सुतार Shirish Pandit Sutar (37, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी – Munjaba Wasti Dhanori ) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शिरीष सुतार हा त्याच्या कुटुंबियांसह तेथे आला होता. बायको, मुले आणि भावाबरोबर आलेला शिरीष पाण्यात उतरला. साधारण सव्वा तीने वाजण्याच्या सुमारास अचानकपणे तो पाण्यामध्ये बुडू लागला. त्यावेळी तेथे उपस्थित असणार्‍या इतरांनी त्याला तलावातून बाहेर काढले. उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मात्र, तेथील डॉक्टरांनी शिरीषचा उपचारापुवर्भच मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिस निरीक्षक जयदीप गायकवाड (Police Inspector Jaydeep Gaikwad),
सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र आळेकर (API Ravindra Alekar) आणि इतरांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, शिरीषचा मृतदेह ससून हॉस्पीटलला (Sasoon Hospital) पाठविण्यात आला.
प्रकरणाचा तपास येरवडा पोलिस स्टेशनमधील (Yerwada Police Station) अधिकारी करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Very Sad ! Youth dies after drowning in swimming pool in Yeravada

The post Pune Crime News | दुर्देवी ! येरवडयातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article