Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रांतवाडी पोलिस स्टेशन – लष्कराच्या परीक्षेत बसविले डमी उमेदवार; तिघांना अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रांतवाडी पोलिस स्टेशन – लष्कराच्या परीक्षेत बसविले डमी उमेदवार; तिघांना अटक

Pune Crime News | Vishrantwadi Police Station – Dummy Candidates Appeared in Army Exam; Three arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | धानोरी येथील शाळेत बॉर्डर रोड ऑरगनायझेशनच्या (Border Road Organization) लेखी परीक्षेत दोघांनी चक्क डमी उमेदवार बसविल्याचे आढळून आले. विश्रांतवाडी पोलिसांनी (Pune Police Crime News) तिघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

परमजित विजयपाल सिंग Paramjit Vijay Pal Singh (वय ३२), रामपती विश्वंभर दयाल Rampati Vishambhar Dayal (वय २३, रा. उत्तर प्रदेश – Uttar Pradesh) आणि सोनु सुरेश (वय २२, रा, हरीयाणा – Haryana) अशी अटक केली आहे. अमन सुरेश (वय १९) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.

याबाबत सहायक प्रशासन अधिकारी अरुणकुमार एस व्ही Assistant Administration Officer Arun Kumar SV (वय ४६, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३७/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरंक्षण दलातील (Defense Force) ग्रीफ बॉर्डर रोड ऑरगनायझेशन (Grief Border Road Organization) यांच्याद्वारे धानोरीतील बी आर ओ स्कुल अँड सेंटर (BRO School and Centre)
येथे मंगळवारी लेखी परीक्षा घेण्यात येत होती.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

त्यात परमजित सिंग याने आपल्या जागी रामपती दयाल याला परीक्षेला बसविले होते.
तसेच अमन सुरेश याने आपल्या जागेवर सोनु सुरेश याला परीक्षेला डमी परिक्षार्थी म्हणून बसविले होते.
परीक्षेदरम्यान फिर्यादी यांचा हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Vishrantwadi Police Station – Dummy Candidates Appeared in Army Exam; Three arrested

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रांतवाडी पोलिस स्टेशन – लष्कराच्या परीक्षेत बसविले डमी उमेदवार; तिघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article