Header

Pune Crime News | विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Crime News | विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Crime News | Vishrantwadi Block Congress President committed suicide by hanging himself

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | विश्रांतवाडीतील (Vishrantwadi) ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विकास शिवाजी टिंगरे Vikas Shivaji Tingre (वय ४९, रा. पोरवाल रोड, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या (Pune Suicide News) केलेल्याचे नाव आहे.

विकास टिंगरे हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसचे (Vishrantwadi Block Congress) ते अध्यक्ष होते. टिंगरे यांचे पोरवाल रस्त्यावरील एका पतसंस्थेच्या शेजारील इमारतीत कार्यालय आहे. तेथे ते दुपारी जेवण मागवायचे. काल त्यांनी दुपारी जेवण न मागविल्याने नेहमी जेवण आणून देणारा नोकर फ्लॅटवर आला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

तेव्हा टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) घटनास्थळी धाव घेतली. टिंगरे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title : Pune Crime News | Vishrantwadi Block Congress President committed suicide by hanging himself

The post Pune Crime News | विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article