Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात; तरुणासह तिघांवर अॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीबरोबर शारीरीक संबंध (Physical Relations) ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडले. लग्नाचा विषय काढल्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत मुंढवा येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Mundhwa Police Station) फिर्याद
(गु. रजि. नं. १५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन सतीश काकडे Sachin Satish Kakade
(वय २५, रा. मंठा, जि. जालना), सतीश काकडे, लक्ष्मी काकडे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार (Atrocities Act)
गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२१ ते डिसेबर २०२२ दरम्यान घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सचिन काकडे याने लग्नाचे आमिष दाखवून
त्यांच्याबरोबर वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. फिर्यादी या गर्भवती राहिल्यानंतर त्यांना लासलगाव
येथे घेऊन जाऊन त्यांचा जबरदस्तीने गर्भपात केला. त्यानंतर त्यांनी लग्नाविषयी विचारल्यावर त्यांना
जातीवाचक बोलून शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Mundhwa Police Station – Forced abortion after intercourse; A case under Atrocity has been registered against three people including the youth
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्याबरोबर व्यवहार करणार्या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल
- Sunny XI Cup Championship Cricket Tournament | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; आर्यन क्रिकेट क्लब संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश !!
- Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला अटक
The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात; तरुणासह तिघांवर अॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.