Header

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या

Railway Summer Special Trains For Konkan | railway summer special trains for konkan pune news

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Railway Summer Special Trains For Konkan | उन्हाळी सुट्टी म्हटलं तर अनेकांना सुंदर अशा कोकणाचे वेध लागतात. अनेक नोकरदार वर्ग देखील सुट्टीला कोकणाकडे रवाना होतो. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणासाठी विशेष गाड्या सोडण्यास आता सुरूवात केली आहे.

 

उन्हाळी सुट्यांमुळे कोकणात (Konkan Trip) जाणाऱ्या प्रवाशांची संख्या विलक्षण वाढते आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. रेल्वेने ही गर्दी कमी करण्यासाठी प्रवाशांना योग्य सोय उपलव्ध करून देत विशेष गाड्या सोडण्यास सुरूवात केली आहे. पुणे (Pune) आणि पनवेलमधून (Panvel) रत्नागिरीसाठी या एकूण १६ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच या साप्ताहिक विशेष गाड्या अनारक्षित असणार आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुणे-रत्नागिरी (Pune-Ratnagiri) ही गाडी ४ मे ते २५ मे या कालावधीत दर गुरूवारी पुण्यातून रात्री ८ वाजून ५०
मिनिटांनी रवाना होईल.ती रत्नागिरीत शुक्रवारी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी दर शनिवारी दुपारी १ वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रस्ता आणि संगमेश्वर रस्ता हे स्टेशन घेणार आहे.

 

 

Web Title :- Railway Summer Special Trains For Konkan | railway summer special trains for konkan pune news

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्‍या दोघांना अटक

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेकडून रस्ते दुरुस्तीची सुमारे 80 टक्के तर पावसाळी कामे 26 टक्के पुर्ण

 

The post Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article