Tulja Bhavani Temple News | भाविकांच्या संतापानंतर तुळजाभवानी मंदिर देवस्थानचा ड्रेस कोडवरून यु टर्न; निर्बंध घातले नसल्याचे स्पष्टीकरण

तुळजापूर : बहुजननामा ऑनलाइन – (Devotees) Tulja Bhavani Temple News | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी भागाऱ्यात जाण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडचा (Dress Code) निर्णय मागे घेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळीच तुळजाभवानी मंदिर (Tulja Bhavani Temple News)प्रवेशासाठी मंदिर संस्थानच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने (Tulja Bhavani Mandir Sansthan Tuljapur) मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. अखेर तुळजाभवानी मंदीर संस्थानने या निर्णयावरुन यु टर्न घेतला आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे (Tehsildar Saudagar Tandale) यांनी याबाबत
परिपत्रक जारी केले आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना
कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आले आहे.
अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही,
असे फलक लावण्यात आले होते. मात्र आता त्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या लग्नसराई सुरू असल्याने तुळजापूरला देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
त्यातच शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्याने पर्यटन आणि देवदर्शन यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरला
येत आहे. मात्र ड्रेसकोड संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता गुरुवारी मंदिर परिसरात अचानक फलक लावण्यात आले.
यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या भाविकांची गैरसोय झाली.
Web Title : Tulja Bhavani Temple News | Tuljabhavani Temple Devotion U-turns on Dress Code After Devotee Rage; Clarification that no restrictions have been imposed
- Tulja Bhavani Temple News | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात झळकले फलक; अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय
- Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून विमाननगर-लोहगाव परिसरातील 2 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई, केलं वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबध्द
- Pune Crime News | पुण्यातील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिकास 5 कोटीची खंडणी मागणार्यांना पकडताना गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गोळीबार, खंडणीबहाद्दर सोलापूरचे तथाकथित पत्रकार
- Bullock Cart Race | बैलगाडा शर्यतीच्या श्रेयवादावरून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये स्टेटस वॉर
- Yerwada Jail News | येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ‘तणावमुक्ती’ बाबत व्याख्यानाचे आयोजन
The post Tulja Bhavani Temple News | भाविकांच्या संतापानंतर तुळजाभवानी मंदिर देवस्थानचा ड्रेस कोडवरून यु टर्न; निर्बंध घातले नसल्याचे स्पष्टीकरण appeared first on बहुजननामा.