Header

Pune Crime News | पुण्यातील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिकास 5 कोटीची खंडणी मागणार्‍यांना पकडताना गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गोळीबार, खंडणीबहाद्दर सोलापूरचे तथाकथित पत्रकार

Pune Crime News | पुण्यातील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिकास 5 कोटीची खंडणी मागणार्‍यांना पकडताना गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गोळीबार, खंडणीबहाद्दर सोलापूरचे तथाकथित पत्रकार

Pune Crime News | A so-called journalist from Solapur, Khandani Bahadur, was shot by the crime branch police while arresting those who demanded a ransom of Rs 5 crore from a software businessman at Eon IT Park in Pune.

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील खराडीमधील इ ऑन आयटी पार्क (eon it park kharadi) येथे सॉफ्टवेअरचा व्यावसाय (Business of software) करणार्‍याकडे 5 कोटीची रूपयांची खंडणी मागणार्‍यांना (extortion case) पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न खंडणीबहाद्दरांनी केला. प्रसंगावधान राखत गुन्हे शाखेतील पोलिसांनी खंडणीबहाद्दरांवर गोळीबार (Firing In Patas) केला असता गोळी खंडणीबहाद्दरांच्या गाडीच्या पाठीमागील चाकांवर लागली आहे. दरम्यान, खंडणीबहाद्दर हे तथाकथत पत्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाटस टोल नाक्याच्या जवळ घडली आहे. (Pune Crime News)

महेश सौदागर हनमे Mahesh Saudagar Hanme (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे (Dinesh Hanme) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे ऑगस्ट 2022 पासून खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिक यांच्याकडे खंडणी मागत होते. त्यांनी तब्बल 5 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. आतापर्यंत व्यावसायिकाने त्यांना 3 लाख 80 हजार रूपये दिलेले आहेत. दरम्यान, हनमे याच्याकडून वेळावेळी पैशाची मागणी होत होती. महेश सौदागर हनमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वगेवगळया खोटया बातम्या तयार करून त्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती. (Pune Crime News)

दरम्यान, आज महेश हनमेने व्यावसायिकास कुठल्याही परिस्थिती 50 लाख रूपये हवे आहेत अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना सोलापूर जिल्हयातील मोहोळ येथील हॉटेल स्वराज येथे बालावले होते. व्यावसायिकाने याबाबतची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिली होती.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr PI Pratap Mankar), पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan) आणि इतर पोलिस अंमलदार हे आरोपींच्या मागावर आज (गुरूवार) मोहोळकडे रवाना झाले.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागली. पाटस टोल नाक्याजवळ पोलिस गेले असता तेथे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला. गोळया गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title : Pune Crime News | A so-called journalist from Solapur, Khandani Bahadur, was shot by the crime branch police while arresting those who demanded a ransom of Rs 5 crore from a software businessman at Eon IT Park in Pune.

The post Pune Crime News | पुण्यातील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिकास 5 कोटीची खंडणी मागणार्‍यांना पकडताना गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गोळीबार, खंडणीबहाद्दर सोलापूरचे तथाकथित पत्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article