Header

Maharashtra Rain Update | रजयत पढल 48 तसत मसळधर पवसच शकयत; हवमनच अदज

Maharashtra Rain Update | रजयत पढल 48 तसत मसळधर पवसच शकयत; हवमनच अदज

Maharashtra Rain Update | very heavy rainfall likely in mumbai madhya maharashtra in next 48 hours imd alert mumbai weather forecast

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department-IMD) पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात मुसळधार (Maharashtra Rain Update) पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 48 तासांत मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. चक्रीवादळामुळे झालेला मुसळधार पाऊस (Heavy Rain) पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

मुंबई (Mumbai), मुंबई उपनगरांसह (Mumbai suburbs) ठाणे (Thane) जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. विकेंडच्या दिवशी पाऊस (Maharashtra Rain Update) झाल्याने मुंबईकरांनी पावसाचा मनसोक्त आनंदही घेतला. विविध जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाही सुखावला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसमी पावसाचा (Rain) जोर वाढला.
मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीपर्यंत पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची
शक्यता आहे. जोरदार पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. वसई, विरार आणि मीरा भाईंदर शहरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. ढगाळ वातावरण असून, वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे.

Web Title : Maharashtra Rain Update | very heavy rainfall likely in mumbai madhya maharashtra in next 48 hours imd alert mumbai weather forecast

The post Maharashtra Rain Update | राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामानाचा अंदाज appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article