Header

Pune Crime News | पतचय हसयसह 10 कट दणयच सनन कल मगण; खडण न दलयस तरगत पठवणयच दल धमक

Pune Crime News | पतचय हसयसह 10 कट दणयच सनन कल मगण; खडण न दलयस तरगत पठवणयच दल धमक

Pune Crime News | Daughter-in-law demands 10 crores with husband’s share; He threatened to send him to jail if he did not pay the ransom

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीच्या निधनानंतर मालमत्तेतील पतीचा हिस्सा, त्याच्याबरोबर आणखी १० कोटी रुपये द्या, नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. जेलमध्ये पाठविन, अशी सुनेने ज्येष्ठ नागरिक असलेल्या सासुला धमकाविल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी बाणेर येथील एका ६४ वर्षांच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुन व तिचे वडिल सुनिल जैन (वय ६३, रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल जैन हे फिर्यादी यांच्या सुनेचे वडिल आहेत. त्यांच्या मुलाचे निधन झाले आहे. फिर्यादी यांची सुन व तिचे वडिल फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादी व त्यांच्या मुलीला सतत प्लॉट नावावर करुन द्या नाही तर मी तुम्हाला सोडून जाईन व तुम्हाला जेलमध्ये पाठविन, अशी धमकी देत. फिर्यादीच्या मुलाचा हिस्सा देऊन त्याशिवाय १० कोटी रुपये द्या. नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही व तुझेवर व तुझ्या मुलावर केसेस टाकून जेलमध्ये पाठविन, अशी धमकी दिली. त्यांच्या औध रोड येथील नातेवाईकांकडे जाऊन त्यांना ही पैसे दिले नाहीत तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली.

फिर्यादी यांनी त्यांच्या सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले सोन्याचे व हिर्‍याचे दागिने त्यांच्या संमतीशिवाय घेऊन जाऊन अपहार केला. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Daughter-in-law demands 10 crores with husband’s share; He threatened to send him to jail if he did not pay the ransom

The post Pune Crime News | पतीच्या हिस्यासह 10 कोटी देण्याची सूनेने केली मागणी; खंडणी न दिल्यास तुरुंगात पाठविण्याची दिली धमकी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article