Header

Pune PMC  Heritage Walks | पण : उपनगर आण शहरलगतचय वरससथळसठह लवकरच सवततर हरटज वक सर

Pune PMC Heritage Walks | पण : उपनगर आण शहरलगतचय वरससथळसठह लवकरच सवततर हरटज वक सर

Pune PMC – Heritage Walks | Separate heritage walks for suburbs and peri-urban heritage sites will also be launched soon Vikas Dhakne

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMC – Heritage Walks | पर्यटकांना शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ऐतिहासिक वास्तुंची माहिती देण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या ‘हेरीटेज वॉक’ च्या विस्तारीकरणाबाबत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. सिंहगड , आंबेगाव येथील शिवसृष्टी, कात्रज येथील इस्कॉन मंदिर आणि शक्य झाल्यास राजीव गांधी प्राणी संग्रहालय तसेच आगा खान पॅलेस, डेक्कन कॉलेज असे दोन स्वतंत्र हेरीटेज वॉक सुरू करण्याबाबत आज प्राथमिक बैठक झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांनी दिली. (Pune PMC – Heritage Walks)

पुणे ऐतिहासिक शहर असून शहराच्या मध्यवर्ती शनिवारवाडा, लाल महाल, नाना वाडा, विश्रामबाग, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग अशी शिवकालीन, पेशवेकालीन आणि साधारण शंभर ते दीडशे वर्षांपुर्वीच्या वास्तू आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या वास्तुंची माहिती पर्यटकांना व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने हेरीटेज वॉकची सुविधा देण्यात येते. यासोबतच शहरापासून काही अंतरावर सिंहगड किल्ला, आंबेगाव येथे नव्याने उभारण्यात येत असलेली शिवसृष्टी, कात्रज येथील इस्कॉन टेंम्पल, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, नगर रस्त्यावरील आगा खान पॅलेस, येरवडा येथील डेक्कन कॉलेज अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. पीएमपीएमएलच्या वतीने सुरू असलेल्या पुणे दर्शनमध्ये यापैकी बरीचशी ठिकाणी आहेत. मात्र, या ठिकाणांचे ऐतिहासिक महत्व व संबधित माहिती देण्यासाठी गाईड नाहीत. तसेच एकाच दिवसांत ही सर्व ठिकाणे पाहाता देखिल येत नाहीत. (Pune PMC – Heritage Walks)

या पार्श्‍वभूमीवर मध्यवर्ती शहराप्रमाणेच अन्य ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांचा भौगोलिक स्थान आणि अंतराचा विचार करून तीन ते चार स्वतंत्र हेरिटेज वॉक सुरू करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात आज संबधित विभागातील अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. वाहन व्यवस्था, गाईडची उपलब्धता, संबधित ऐतिहासिक वास्तू आणि वारसास्थळांच्या ठिकाणच्या सोयी सुविधा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. लवकरच याला मूर्तस्वरूप देण्यात येईल, अशी माहिती ढाकणे यांनी दिली.

Web Title : Pune PMC – Heritage Walks | Separate heritage walks for suburbs and peri-urban heritage sites will also be launched soon Vikas Dhakne

 

The post Pune PMC – Heritage Walks | पुणे : उपनगरे आणि शहरालगतच्या वारसास्थळांसाठीही लवकरच स्वतंत्र हेरिटेज वॉक सुरू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article