Header

Pune Crime News | हदतवनषठ करयकरत शरद महळसह 7 जणच अपहरण खडण जव मरणयच धमकचय गनहयतन नरदष मकतत

Pune Crime News | हदतवनषठ करयकरत शरद महळसह 7 जणच अपहरण खडण जव मरणयच धमकचय गनहयतन नरदष मकतत

Pune Crime News | 7 persons including pro-Hindu activist Sharad Mohol acquitted of kidnapping, extortion, death threats

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | 2011 मध्ये पौड पोलीस स्टेशन येथे अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकीच्या दाखल गुन्ह्यात आज पुणे सत्र न्यायालयाने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शरद मोहोळ (Sharad Mohol) व इतर सात जणांची निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. डी. निंबाळकर (Additional Sessions Judge V.D. Nimbalkar) यांनी हा निकाल दिला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, 2011 मध्ये पौड येथील एका उद्योजकाच्या अपहरणाबाबत दाखल गुन्ह्यात खंडणी विरोधी पथक (पुणे) Anti Extortion Cell Pune (AEC Pune) आणि पौड पोलिसांनी (Paud Police) शरद मोहोळ व इतर जणांवर खंडणी मागणे, अपहरण करणे ,मारहाण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. (Pune Crime News)

तब्बल तेरा वर्षानंतर एकाही साक्षीदाराने सरकार पक्षाच्या बाजूने साक्ष न दिल्याने व त्या वेळच्या काही पोलिसांनी जबरदस्ती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचे मेहरबान न्यायालयात (Pune Shivaji Nagar Court) शपथेवर सांगितले. तसेच शरद मोहोळ व इतरांकडून गुन्ह्यात कोणत्याही प्रकारची मालमत्तेची जप्ती सिद्ध होऊ शकली नाही.

या सर्व गोष्टींचे अवलोकन करून न्यायालयाने शरद मोहोळ याच्यासह इतर सात जणांची निर्दोष मुक्तता केली.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट (German Bakery Bomb Blast), कर्नाटक मधील चेन्नास्वामी स्टेडियम येथील बॉम्बस्फोट (Chinnaswamy Stadium Blast), दिल्ली येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील कुख्यात आतंकवादी कातील सिद्धकी (Katil Siddiqui Murder Case) याच्या खुनाच्या गुन्ह्यातून दोन वर्षांपूर्वी शरद मोहोळची निर्दोष मुक्तता झाली होती. येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये कातिल सिद्दिकी याची बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती.

खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग (Adv. Vipul Dushing), ॲड.सौरभ तडवी (Adv. Saurabh Tadvi), ॲड. बिलाल मणियार (Adv. Bilal Maniyar), ॲड.तानाजी सोलणकर (Adv. Tanaji Solankar),ॲड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांनी कामकाज पाहिले.

Web Title : Pune Crime News | 7 persons including pro-Hindu activist Sharad Mohol acquitted of kidnapping, extortion, death threats

The post Pune Crime News | हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शरद मोहोळसह 7 जणांची अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article