Pune Crime News | हटल कमगरन जव मरणयच परयतन करन लबडल; वडगव शर यथल घटन

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेलमधील काम संपवून घरी जात असताना तिघा चोरट्यांनी दोघा हॉटेल कामगारांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. त्यांची मोटारसायकल जबरदस्तीने चोरुन नेली. (Pune Crime News)
याप्रकरणी ओंकार शंकर साबळे (वय २१, रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. ४३१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगाव शेरी येथील विद्याअंकुर स्कुलजवळ मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ कोरेगाव पार्क येथील पालमोको हॉटेलचे (Palmoko Hotel Koregaon Park) काम करुन मोटारसायकलवरुन घरी जात होते. विद्याअंकुर स्कुलजवळ थांबून पायातील बुटाची लेस बांधत असताना मोटारसायकलवरुन तिघे जण आले. त्यांनी दोघांना दमदाटी करुन मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी विरोध केला. त्यांच्यातील एकाने कमरेचे हत्यार काढून फिर्यादी यांच्यावर वार केला. ते तो वार चुकवत असताना त्यांच्या उजव्या हाताच्या तीन बोटांवर वार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. फिर्यादी यांचा मावस भाऊ सोडविण्यासाठी आले असताना इतर दोघांनी त्यांना व फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) केली. त्यांच्यातील एकाने फिर्यादीच्या मावस भावाच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. त्यांची मोटारसायकल जबरदस्तीने चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे (PSI Dombale) तपास करत आहेत.
Web Title : Pune Crime News | Hotel workers robbed with attempted murder; Incident at Vadgaon Sherry
- Pune PMC – Heritage Walks | पुणे : उपनगरे आणि शहरालगतच्या वारसास्थळांसाठीही लवकरच स्वतंत्र हेरिटेज वॉक सुरू
- ACB Trap News | सव्वा लाखाची लाच घेताना महापालिकेतील अग्निशमन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
The post Pune Crime News | हॉटेल कामगारांना जीवे मारण्याचा प्रयत्न करुन लुबाडले; वडगाव शेरी येथील घटना appeared first on बहुजननामा.