Header

Pune Crime News | पणयतल शकरवर पठत पत पतनच मतदह आढळलयन परचड खळबळ पतन गळफस घवन कल आतमहतय

Pune Crime News | पणयतल शकरवर पठत पत पतनच मतदह आढळलयन परचड खळबळ पतन गळफस घवन कल आतमहतय

Pune Crime News | There was a lot of excitement after the dead bodies of husband and wife were found in Pune’s Friday Peth, the husband committed suicide

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | शहरातील शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth) सेवा मित्र मंडळाजवळ राहणार्‍या पती-पत्नीचे मृतदेह घरात आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे (Husband Wife Dead Body Found In Shukrawar Peth Pune). दरम्यान, पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे तर पतीने गळफास घेवून आत्महत्या (Suicide In Pune) केली आहे. ही घटना रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Pune Crime News)

हेमंत रामकृष्ण थोरात (64) आणि सुनिता हेमंत थोरात (58, दोघे रा. चिंचेची तालीम जवळ, सेवा मित्र मंडळ जवळ, शुक्रवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनिता थोरात या गेल्या 3-4 वर्षापासून आजारी होत्या. रविवारी सकाळी याबाबत खडक पोलिसांना (Khadak Police Station) समजले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (Pune Crime News)

सुनिता हेमंत थोरात यांचा मृतदेह बेडवर होता तर हेमंत थोरात यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालानंतर सुनिता थोरात यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सुनिता थोरात यांच्या अंगावर कुठेही जखमा नसल्याची माहिती समोर येत आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

रविवारी भल्या सकाळी शुक्रवार पेठेत अशा पध्दतीची घटना
घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेमंत थोरात यांच्या आत्महत्येचे कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे.

Web Title : Pune Crime News | There was a lot of excitement after the dead bodies of husband and wife were found in Pune’s Friday Peth, the husband committed suicide

The post Pune Crime News | पुण्यातील शुक्रवार पेठेत पती, पत्नीचे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, पतीने गळफास घेवुन केली आत्महत्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article