Header

Pune Crime News | पतरकरवर गळबर कलय परकरणत गनह शखच बगलर यथ करवई; शरप शटर शरयश मत यल घतल तबयत

Pune Crime News | पतरकरवर गळबर कलय परकरणत गनह शखच बगलर यथ करवई; शरप शटर शरयश मत यल घतल तबयत

Pune Crime News | Crime Branch action in Bengaluru in case of firing on journalist; Sharp shooter Shreyash Mate has been taken into custody

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | जमिनीच्या व्यवहारातील वादातून सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार (Attack on Journalist In Pune) करुन त्यांच्या खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्या प्रकरणाने आता अधिक गंभीर स्वरुप घेतले असून गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बंगलुरु येथे कारवाई केली आहे. तेथून शॉर्प शुटर श्रेयश मते Sharp Shooter Shreyash Mate (वय २१) याला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

दोन दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना ताब्यात घेतले असून त्यात ७ जण अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इतर ६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात खून करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचे स्मार्तना पाटील यांनी सांगितले होते. मते याला अटक केल्यानंतर यातील प्रमुख सुत्रधार नेमका कोण व त्याने किती रुपयांची सुपारी दिली होती, याची नेमकी माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर गोळीबार (Firing In Pune) केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. त्याच वेळी अन्य ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. (Pune Crime News)

फिर्यादी यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही. मात्र, धायरी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीवरुन वाद सुरु आहे. फिर्यादी हे २७ मे रोजी रात्री महर्षीनगर येथून घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याने मारण्याची धमकी दिली. त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर ११ जून रोजी रात्री ते दुचाकीवरुन घरी जात असताना तीन दुचाकीवरुन आलेल्या ५ जणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याचवेळी ते खाली वाकल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. या गुन्ह्यातील वाढत असलेल्या गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखाही तपास करु लागली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

स्वारगेट पोलिसांनी याअगोदर प्रथमेश ऊर्फ शंभू धनंजय तोंडे Prathamesh alias Shambhu Dhananjay Tonde (वय २०, रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी) आणि अभिषेक शिवाजी रोकडे Abhishek Shivaji Rokde
(वय २२, रा. नांदेड गाव) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर आता अल्पवयीनांसह १३ जणांना पकडण्यात आले होते.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी श्रेयश मते याला बंगलुरु येथून ताब्यात घेतले आहे.
श्रेयश मते याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) दोन वर्षांपूर्वी नोंदविण्यात आला आहे.

रुपेश पासलकर हा त्याच्या मित्रासह गप्पा मारत थांबला असताना श्रेयश मते व त्याचे दोन साथीदार आले व
त्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हवेली पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

Web Title : Pune Crime News | Crime Branch action in Bengaluru in case of firing on journalist; Sharp shooter Shreyash Mate has been taken into custody

The post Pune Crime News | पत्रकारावर गोळीबार केल्या प्रकरणात गुन्हे शाखेची बंगलुरु येथे कारवाई; शॉर्प शुटर श्रेयश मते याला घेतले ताब्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article