Header

Pune Crime News | धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल

Pune Crime News | धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल

Pune Crime News | Shocking! Another mobile phone found in Yerawada Jail

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पंधरा दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात (Yerawada Jail) मोबाईल सापडल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने घेतलेल्या झडती मध्ये आणखी एक सीमकार्ड नसलेला मोबाईल सापडल्याचा (Mobile Phones Found) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News) कारागृहात कडक पोलीस बंदोबस्त असताना मोबाईल कारागृहात गेलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुरुंग अधिकारी अतुल तुवर (Jail Officer Atul Tuvar) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुवर हे येरवडा कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांच्या बरॅक आणि आजुबाजूच्या परिसराची नियमित झडती घेत असतात. 6 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्कल एक येथील बरॅक क्रमांक 8 परिसरात तुरुंगाधिकारी ए.एस. कांदे (Jailor A.S. Kande) हे झडती घेत होते. (Pune Crime News)

झडती घेत असताना कांदे यांना एक इंटेल कंपनीचा मोबाईल बॅटरीसह सापडला. मात्र त्या मोबाईल मध्ये सीमकार्ड नव्हते. याबाबत प्रभारी अधीक्षक एस.बी. पाटील (Superintendent S.B. Patil) यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर तुवर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 188, 120 (ब), कारागृह कायदा 1894 च्या नियम 42, 45 (12) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : Pune Crime News | Shocking! Another mobile phone found in Yerawada Jail

The post Pune Crime News | धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article