Pune RTO Office News | पण परदशक परवहन करयलयच उरळ कचन यथल शबर 14 ऐवज 26 जन रज

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune RTO Office News | संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्याच्या (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023) पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने (Pune Regional Transport Office) अनुज्ञप्ती चाचणीसाठी उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथे आयोजित शिबीर कार्यालय १४ जून ऐवजी २६ जून रोजी घेण्यात येणार आहे. (Pune RTO Office News)
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी पुणे येथून सोलापूर रोड मार्गे उरुळी कांचनकडे १४ जुन २०२३ रोजी प्रयाण करणार आहे. या दिवशी पुणे-सोलापूर महामार्गावरील इतर वाहतूक बहुतांश प्रमाणात बंद असते. त्यामुळे शिबीर कार्यालयामध्ये पोहोचताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे.
यास्तव ज्या उमेदवारांना अनुज्ञप्ती चाचणीसाठी उरुळी कांचन शिबीर कार्यालयातील १४ जून
रोजीची अपॉइंटमेंट मिळालेली आहे अशा उमेदवारांनी अनुज्ञप्ती चाचणीसाठी २६ जून रोजी शिबीर कार्यालयाच्या
पूर्वनियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे (Pune RTO Ajit Shinde) यांनी केले आहे.
Web Title : Pune RTO Office News | Camp of Pune Regional Transport Office at Uruli Kanchan on 26th June instead of 14th
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्ते खेळताना झालेल्या भांडणातून एकाचा खून
- ACB Trap On Talathi News | 50 हजाराची लाच घेताना सराईत लाचखोर तलाठ्यास अॅन्टी करप्शनकडून अटक
- Social Justice & Special Assistance Department Maharashtra | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू
- Disabled Welfare Department Maharashtra | दिव्यांग कल्याण विभाग : मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता नागपुर, पुणे, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात 16 पुनर्वसनगृह होणार
- Maharashtra Relief And Rehabilitation Department | महाराष्ट्र राज्य – मदत व पुनर्वसन विभाग : सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी
The post Pune RTO Office News | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उरुळी कांचन येथील शिबीर 14 ऐवजी 26 जून रोजी appeared first on बहुजननामा.