Sangli Crime News | सगल हदरल ! रषटरवदचय करयकरतयच 8 गळय झडन हतय; परचड खळबळ

सांगली : बहुजननामा ऑनलाइन – Sangli Crime News | शनिवारी रात्री सांगली शहरात राष्ट्रवादीच्या (Sangli Ncp Worker Murder) कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या (Murder In Sangli) करण्यात आल्याची घटना घडली. नालसाब मुल्ला (Nalsab Mulla NCP) असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. एकापाठोपाठ आठ गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली शहर हादरले आहे.
बुलेट गाडीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत एकाच वेळी आठ गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात (Sangli Crime News) एकच खळबळ उडाली होती. याबाबत घटनेची माहिती मिळताच, सांगली पोलीस (Sangli Police) अधीक्षक बसवराज तेली (IPS Basavaraj Teli) यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की नालसाब मुल्ला हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र, मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. याआधी त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल होते. परंतु, मागील काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या घराबाहेर बसले असता अज्ञात दोघा हल्लेखोरांनी येऊन मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक असे आठ राऊंड फायर केले. ज्यामध्ये नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (Sangli Government Hospital)
उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र,
सध्या मुल्ला यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली.याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (NCP Worker Shot Dead In Sangli)
Web Title : Sangli Crime News | NCP Worker Nalsab Mulla Shot Dead In Sangli 8 Round Fire
- MLA Manisha Kayande | ठाकरे गटाला मोठा धक्का! मनीषा कायंदे नॉट रिचेबल; शिंदे गटात करणार प्रवेश?
- Pune Bibvewadi Fire News | पुणे : बिबवेवाडी परिसरात गोदामांना भीषण आग; मंडप साहित्याच्या गोदामासह 20 गोदाम अग्नीच्या भक्ष्यस्थानी*
The post Sangli Crime News | सांगली हादरली ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची 8 गोळ्या झाडून हत्या; प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.