Header

Ajit Pawar | महरषटरल मळल दन उपमखयमतर अजत पवरन घतल उपमखयमतर पदच शपथ

Ajit Pawar | महरषटरल मळल दन उपमखयमतर अजत पवरन घतल उपमखयमतर पदच शपथ

Ajit Pawar | ajit pawar new deputy cm of maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहेत. राज्यपालांना भेटून त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज मंत्रिमंडळाचा (Maharashtra Politics News) दुसरा शपथविधी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राजभवनात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

https://twitter.com/ANI/status/1675432180548349954?s=20

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे नेते व मंत्री राजभवनात उपस्थित आहेत. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram), आदिती तटकरे (Aditi Tatkare), संजय बनसोडे (Sanjay Bansode), अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Maharashtra Politics News)

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.

अजित पवार सोबत 40 पेक्षा अधिक आमदार

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि 40 पेक्षा अधिक आमदार देशासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकत्र येत असतील तर ते महत्त्वाचं आहे. मोदींनी जो संकल्प केला आहे त्याला साथ देण्यासाठी अजित पवार आणि सर्व लोक आले आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो, असे बावनकुळे म्हणाले.

Web Title : Ajit Pawar | ajit pawar new deputy cm of maharashtra

The post Ajit Pawar | महाराष्ट्राला मिळाले दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article