Header

PMC Property Tax | पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी मुदत वाढ

PMC Property Tax | पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी मुदत वाढ

PMC Property Tax | relief for the people of pune extension of deadline for payment of income tax by municipal corporation

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या मिळकत कर (PMC Property Tax) विभागाचा सर्व्हर डाऊन (Server Down) झाल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. सर्वसाधरण करामधील 5 टक्के सवलतीची आज अंतिम (31 जुलै) तारीख आहे. तसेच थकबाकीवर 2 टक्के शास्तीची (Shasti Kar) आकारणी होणार आहे. त्यामुळे कर भरणा (PMC Property Tax) केंद्रावर गर्दी केलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. याबाबतचे वृत्त पोलीसनामाने दिले होते. यानंतर महापालिका प्रशासनाने मिळकत कर भरणाऱ्यांना दिलासा दिला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मिळकत कर (PMC Property Tax) आकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Ajit Deshmukh) म्हणाले, शहरातील सर्वच कर भरणा केंद्रांवरील सर्व्हर बंद असल्याने मिळकत कर भरण्यास नागरिकांना अडचणी येत होती. 11 वाजता बंद पडलेले सर्व्हर अडीच वाजता सुरू झाले. परंतु गती कमी आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांना 2 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) नागरिकांना 15 मे ते 31 जुलै या अडीच महिन्याच्या
कालावधीत निवासी मिळकत करावर पाच ते दहा टक्के सूट देण्यात आली आहे.
गेल्या अडीच महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न जमा झाले आहे.
आज या सवलतीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कर भरणा करण्यासाठी नागरिकांची गडबड सुरु आहे.

ऑनलाईन आणि क्षेत्रीय कार्यालयातील (Regional Office) नागरी सुविधा कार्यालयात जाऊन नागरिक कर भरत आहेत.
सकाळी दहा वाजल्यापासून क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली आहे.
कर भरण्यासाठी नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहे. मात्र, एकाच वेळी अनेक नागरिक संकेतस्थळावर कर
भरत असल्याने महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा कोलमडली आहे.

Web Title :  PMC Property Tax | relief for the people of pune extension of deadline for payment of income tax by municipal corporation

हे देखील वाचा

The post PMC Property Tax | पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी मुदत वाढ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article