Pune Crime News | कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून त्याच्या मृत्युबाबत जाब विचारणार्या महिलेचा विनयभंग; कोरेगाव पार्कमधील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | भरधाव जाणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला उडविल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला. याचा जाब विचारणार्या महिलेला शिवीगाळ करुन अश्लिल हावभाव करीत विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळु माणिक गायकवाड Balu Manik Gaikwad (वय २७, रा. धावडे वस्ती, भोसरी एमआयडीसी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवर (North Main Road Koregaon Park) शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हिने जॉकी बार समोर कुत्र्यांना पाणी पाजून कुत्र्यांचे पिल्लु रस्ता ओलांडत होते. यावेळी गायकवाड याची गाडी वेगाने आली. तिने कुत्र्याच्या पिल्यावर गाडी घातल्याने त्याचा मृत्यु झाला. याचा जाब फिर्यादी यांनी विचारल्याने गायकवाड याने त्यांना शिवीगाळ करुन अश्लिल हावभाव करुन निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक नरळे (PSI Narle) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | molestation of a woman who drove over a dog and questioned its death incident in koregaon park
हे देखील वाचा
- Kashish Social Foundation | राज्यातील डॉक्टरांचा चॅरिटी फॅशन शो मोठ्या उत्साहात संपन्न
- Pune Crime News | लोहियानगरमध्ये तरुणाचा गळा दाबून केला खून; तीन ते चार दिवसांपूर्वी खून केल्याचा संशय
- Vijay Choudhary | ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाले विश्व विजेता; वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2023 मध्ये भारतासाठी मिळवले सुवर्णपदक
- BJP National Executive | भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकरांवर मोठी जबाबदारी
The post Pune Crime News | कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून त्याच्या मृत्युबाबत जाब विचारणार्या महिलेचा विनयभंग; कोरेगाव पार्कमधील घटना appeared first on बहुजननामा.