Header

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! चोरट्यांनी वेअर हाऊसमधून लंपास केले तब्बल 65 लाखांचे 105 आय फोन

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! चोरट्यांनी वेअर हाऊसमधून लंपास केले तब्बल 65 लाखांचे 105 आय फोन

Pune Crime News | Unidentified persons steal iPhones worth ₹65 lakh from Wagholi warehouse

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा तोडून चोरट्यांनी तब्बल 65 लाख रुपये किंमतीचे 105 आयफोन चोरुन (Stealing iPhone) नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना (Pune Crime News) वाघोली भागात घडली आहे. चोरट्यांनी आय फोन 14 प्रो कंपनीचे मोबाईल वेअर हाऊसमधून (Warehouse) चोरुन नेले आहेत. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत वैभव झेंडे (Vaibhav Zende) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. वैभव झेंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वैभव झेंडे यांनी शनिवारी (दि.15) रात्री वेअर हाऊस कुलूप लावून बंद करुन निघून गेले. रात्री उशीरा अज्ञात चोरट्याने कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन कंपनीचे (Connect Supply Chain Solutions Company) सीमा वेअर हाऊसच्या वरील सिमेंटचा पत्रा फोडून वेअर हाऊसमध्ये प्रवेश केला.

चोरट्याने वेअर हाऊसमध्ये असलेले 65 लाख रुपये किंमतीचे ॲपल कंपनीचे आयफोन 13 (Apple iPhone 13), आयफोन 14
(iPhone 14), आयफोन 14 प्रो (iPhone 14 Pro) या मॉडेलचे वेगवेगळ्या रंगाचे मोबाईल फोनचे 105 सेट, 1 मोबाईल चार्जिंग,
5 अ‍ॅडपटर केबल चोरून नेले. रविवारी (दि.16) सकाळी झेंडे यांनी वेअर हाऊस उघडले असता हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला आहे.

Web Title : Pune Crime News | Unidentified persons steal iPhones worth ₹65 lakh from Wagholi warehouse

The post Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! चोरट्यांनी वेअर हाऊसमधून लंपास केले तब्बल 65 लाखांचे 105 आय फोन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article