Pune Crime News | अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्या ‘मजनू’ला दाखविली कोठडी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रेमात ब्रेकअप घेतल्यानंतर सदाशिव पेठेत तरुणीवर भरदिवसा कोयत्याने वार (Attack On Girl In Sadashiv Peth Pune) करण्याची घटना नुकतीच घडली असताना कोंढव्यातही असा प्रकार होऊ पहात होता. प्रेमसंबंध (Love Affair) सुरु ठेवण्यासाठी अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्या मजनूला कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अदनान जाफर शेख Adnan Jaffer Shaikh (वय २१, रा. मिठानगर, कोंढवा) असे अटक केलेल्या मजनूचे नाव आहे. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७२९/२३) दिली आहे. हा प्रकार कात्रज, तळजाई, पद्मावती, कोंढवा येथे डिसेबर २०२२ पासून १४ जुलै २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अदनान शेख याने फिर्यादी अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवणूक
(Cheating Case) वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन गेला. तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले.
त्यामुळे तिने शेख याच्याबरोबर ब्रेकअप केला. तेव्हा त्याने फिर्यादीचे फेक इन्टाग्राम अकाऊंट (Fake Instagram Account) काढून त्यावर फिर्यादी व त्याचे फोटो व्हायरल केले. फिर्यादी ही शुक्रवारी रात्री घराजवळ असताना त्याने तू माझेबरोबर चल, असे तिला म्हणाला. तिने नकार दिल्यावर त्याने कमरेचा चाकू दाखवून मी तुला विचार करण्यास दोन दिवसांचा वेळ देतो, तू माझी झाली नाही तर मी तुझे तुकडे तुकडे करुन टाकीन, अशी धमकी दिली. या घटनेने घाबरलेल्या मुलीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी शेख याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक बाबर (Assistant Police Inspector Babar) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | ‘Majnu’, who threatened a minor girl with a knife, was shown custody
- Pune Crime News | डेक्कन पोलिस ठाण्यातच हॉटेल मालकानं घातली गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाशी हुज्जत, पुढं झालं असं काही…
- Bengaluru Smashers | इंडियन ऑइल UTT सीझन 4 मध्ये पदार्पण करणार्या बंगळुरू स्मॅशर्स संघाच्या जर्सीचे अनावरण दिग्गजांच्या उपस्थितीत
The post Pune Crime News | अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्या ‘मजनू’ला दाखविली कोठडी appeared first on बहुजननामा.