Header

Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून 8 महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला अटक

Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून 8 महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला अटक

Pune Crime News | sinhagad road police arrested the accused in mcoca crime who was absconding for 8 months

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील MCOCA (Mokka Action) फरार आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) शिताफीने अटक (Arrest) केली आहे. मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर आठ महिन्यांनी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई (Pune Crime News) गुरुवारी (दि.27) भुमकर चौकाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळ (Swami Narayan Temple Pune) केली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आकाश सुभाष गाडे Akash Subhash Gade (वय-25 रा. रामनगर, सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) आयपीसी 307, 504, 506(2),34, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Amendment Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. (Pune Crime News)

मोक्का गुन्ह्यातील आरोपीचा तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार देवा चव्हाण (Police Deva Chavan) व सागर शेडगे (Police Sagar Shedge) यांना माहिती मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ थांबला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कारवाईसाठी सिंहगड रोड विभागाचे (Sinhagad Road Division) सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil,
पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Sr PI Abhay Mahajan), पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर
(PI Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam),
गणेश मोकाशी (API Ganesh Mokashi), पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर (PSI Aba Uttekar)
पोलीस अंमलदार संजय शिंदे, विकास पांडुळे, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर,
स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, राजु वेंगरे, अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | sinhagad road police arrested the accused in mcoca crime who was absconding for 8 months

The post Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून 8 महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article