Header

Pune Police News | सोशल मिडीयामुळे हरवलेली आज्जी सुखरूपपणे कुटुंबाच्या ताब्यात, वारजे मार्शल पोलिसांची कामगिरी

Pune Police News | सोशल मिडीयामुळे हरवलेली आज्जी सुखरूपपणे कुटुंबाच्या ताब्यात, वारजे मार्शल पोलिसांची कामगिरी

Pune Police News | missing grandmother safely in family custody thanks to social media thanks to beat marshal warje malwadi police

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police News | सोशल मिडियाचा (Social Media) जसा तोटा आहे तसा फायदा देखील आहे. सोशल मिडियाचा वापर आता पोलीस देखील करत असून त्यांना फायदा मिळत आहे. असेच एक उदाहरण वारजे मधून समोर आले आहे. वारेज मार्शलने (Pune Police News) एका रस्ता चुकलेल्या आणि घराचा पत्ता न सांगता येणाऱ्या आजीला (Old Woman) सुखरुपपणे तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले आहे. या आजीला तिच्या घरी पोहोचवण्यासाठी वारजे पोलिसांनी सोशल मिडियाची मदत घेतली.

वारजे पोलीस ठाण्यातील (Warje Police Station) मार्शल अमोल सुतकर (Marshal Amol Sutkar) आणि ज्ञानेश्वर माने (Dnyaneshwar Mane) हे पेट्रोलींग (Pune Police News) करत होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास एक आज्जी गोंधळलेल्या अवस्थेत रस्त्याने फिरताना दिसल्या. सुतकर आणि माने यांनी आज्जीकडे चौकशी केली, त्यांच्या घराचा पत्ता त्यांना विचारला. मात्र, आज्जीला काहीच सांगता आले नाही. त्यांचा स्मृतिभ्रंश झाला असावा आणि पावसाची रात्र, थंडी अशा वातावरणात आज्जीच्या प्रकृतीची काळजी करुन सुतकर आणि माने यांनी आज्जीला पोलीस ठाण्यात घेऊन आले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आज्जीला तिच्या घरच्यांकडे सुखरुप पोहोचवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar), पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल शिंदे, पोलीस नाईक संतोष नांगरे, पोलीस शिपाई अमोल सुतकर, ज्ञानेश्वर माने, योगेश वाघ यांच्यासह वारजे पोलीस स्टेशनची यंत्रणा कामाला लागली. हद्दीत आणि आजूबाजूच्या कोणत्या चौकीला मिसिंग दाखल झाली आहे का याची माहिती घेतली गेली. मात्र आज्जीबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती.

अखेर पोलीस मार्शल (Warje Police Marshall) अमोल सुतकर यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला.
त्यांनी आज्जीचा फोटो स्टेटस आणि ग्रुपवर पाठवला. दुसऱ्यादिवशी एका तरुणाने सुतकर यांच्याशी संपर्क साधून आपण
या आजीला ओळखत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या तरुणाला बोलावून घेतले.
तरुणाने ही आज्जी कर्वेनगर येथील वडार वस्तीमध्ये राहत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी वडार वस्तीमध्ये आजीच्या घराचा शोध घेऊन तिला त्यांचा मुलगा विश्वास तुळशीराम बनसोडे यांच्या
ताब्यात दिले. या महिलेचे नाव वैजयंती तुशीराम बनसोडे आहे.
सुतकर आणि माने यांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

 

Web Title : Pune Police News | missing grandmother safely in family custody thanks to social media thanks to beat marshal warje malwadi police

हे देखील वाचा

The post Pune Police News | सोशल मिडीयामुळे हरवलेली आज्जी सुखरूपपणे कुटुंबाच्या ताब्यात, वारजे मार्शल पोलिसांची कामगिरी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article