Header

Pune Crime News | कोंढवा पोलीस : शाळेच्या मालमत्तेच्या वादात शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या तिघांवर गुन्हा

Pune Crime News | कोंढवा पोलीस : शाळेच्या मालमत्तेच्या वादात शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या तिघांवर गुन्हा

Pune Crime News | Kondhwa Police Registered FIR On Three In Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | शाळेच्या मालमत्तेवरुन दोघा प्रिन्सिपल व त्यांच्या भावांमध्ये वाद सुरु आहे. त्यात भावाने शिक्षिकेला शाळेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७१०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जुबेर रशिद खान Zubair Rashid Khan (वय ४५, रा. पदमजी पार्क, नाना पेठ), अजहर खान Azhar Khan (वय ३८) आणि अफाक अन्सार खान Afaq Ansar Khan (वय ४०) यांच्यावर गुन्हा दखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील मिठानगर (Mitha Nagar Kondhwa) येथील प्राथमिक शाळेत ५ जुलै २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोंढव्यातील मिठानगर येथील एका प्राथमिक शाळेत टिचर म्हणून काम करतात. शाळेच्या प्रिन्सिपल आणि त्यांचा भाऊ जुबेर यांच्यात शाळेच्या मालमत्तेवरुन वाद चालू आहेत. फिर्यादी या नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जात असताना गेटवरच जुबेर याने फिर्यादी यांचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. शाळेत न जाण्याची धमकी दिली. तसेच इतरांनी फिर्यादीस शाळेत जायचे नाही नाही तर आम्ही तुला मारणार अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल (API Torgal) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Kondhwa Police Registered FIR On Three In Molestation Case

 

Pune Crime News | पुण्यात एकतर्फी प्रेमातून 37 वर्षीय महिलेवर खुनी हल्ला ! कोरेगाव पार्क परिसरातील बर्निंट घाट येथील घटना

Pune Gold Rate Today | पुण्यातील आजचा सोने आणि चांदीचा भाव किती? जाणून घ्या

GST Council Meet | औषध, खाद्यपदार्थ स्वस्त तर गाडी घेणं महागलं; GST बैठकीत काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या

ACB Trap News | स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

 

The post Pune Crime News | कोंढवा पोलीस : शाळेच्या मालमत्तेच्या वादात शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या तिघांवर गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article