Header

Pune Crime News | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Tired of being harassed, the wife committed suicide by hanging herself; A case has been filed against seven people including the husband

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | सासरी होणार्‍या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

गिता जाधव (वय ३४, रा. भावडी, लोणीकंद) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यानुसार पोलिसांनी पती रमेश जाधव, सासरे प्रभाकर जाधव, सासु कमाबाई जाधव, दीर गणेश जाधव, सुरेश जाधव, जाऊ काशीबाई जाधव, मनिषा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत भगवान व्यंकटराव मेढे (वय ३९, रा. माजलगाव, जि. बीड)
यांनी लोणीकंद पोलिसांकडे (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५७४/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांची बहिण गीता जाधव हिचा रमेश जाधव याच्याशी विवाह झाला होता.
लग्न झाल्यापासून माहेरहून दुचाकी घेण्यासाठी १ लाख रुपये घेऊन ये़ प्लॉट खरेदीसाठी ५ लाख रुपये का घेऊन येत नाही
असे म्हणून तिला शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती.

उपाशी ठेवून शारीरीक व मानसिक छळ केला जात होता.
गेल्या १५ वर्षापासून हा त्रास गीता जाधव सहन करीत होत्या.
तरीही छळ कमी न झाल्याने शेवटी त्यांनी १२ जुलै रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु (API Rajguru) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Tired of being harassed, the wife committed suicide by hanging herself; A case has been filed against seven people including the husband

The post Pune Crime News | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article