Header

Pune Crime News | कात्रजमध्ये घरात शिरुन मायलेकींवर कुर्‍हाडीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Pune Crime News | कात्रजमध्ये घरात शिरुन मायलेकींवर कुर्‍हाडीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Pune Crime News | In Katraj, an attempt was made to break into the house and kill Mileki with an axe

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | पूर्ववैमनस्यावरुन नातेवाईक असलेल्या तरुणाने घरात शिरुन कुर्‍हाडीने मायलेकींवर वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा (Attempt To Kill) प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

या घटनेत रेश्मा प्रेमबाबु वाल्मिकी (वय ३५) आणि त्यांची मुलगी ऋतुजा (वय १८, रा. संतोषनगर, कात्रज) या दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) प्रेमकुमार नारीया Premkumar Naria (रा. कोंढवा – Kondhwa) याच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाल्मिकी यांच्या घरात शनिवारी रात्री आठ वाजता घडली. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिकी कुटुंब मागील काही वर्षांपासून कात्रज येथे राहतात. प्रेमबाबु हे एका खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचे काम करताात. त्यांची पत्नी रेश्मा वाल्मिकी यांच्या बहिणीचा चुलत भाचा प्रेमकुमार नारीया हा जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांच्या घरी आला. त्यावेळी दोघी मायलेकी घरात होत्या. फिर्यादी यांनी त्यांच्या लग्नास विरोध केला होता. या रागातून त्याने मुलीवर कुर्‍हाडीने वार करण्यात सुरुवात केली. पहिला वार तिने हाताने अडविला. दुसरा वार तिच्या डोक्यावर करण्यात आला. तिला वाचविण्यासाठी रेश्मा मध्ये धावल्या.

त्याने त्यांच्याही डोक्यात, पायावर आणि हातावर वार करुन गंभीर जखमी केले.
या दोघींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजू बाजूचे लोक धावत आले.
पण त्याच्या हातातील कुर्‍हाड पाहून कोणी पुढे आले नाही. गर्दी जमलेली पाहून आरोपीने तेथून पळ काढला.
त्यानंतर दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे़. सहायक पोलीस निरीक्षक तावडे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | In Katraj, an attempt was made to break into the house and kill Mileki with an axe

The post Pune Crime News | कात्रजमध्ये घरात शिरुन मायलेकींवर कुर्‍हाडीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article