Header

Pune Crime News | पत्नीला पळविल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न

Pune Crime News | पत्नीला पळविल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न

Pune Crime News | Attempted murder by stabbing a young man in the head with a Koyta out of anger for abducting his wife

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्न झाले असताना दुसर्‍याबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live in Relation) राहत असल्याच्या रागातून पतीने तरुणावर कोयत्याने डोक्यावर, कानावर, हातावर वार करुन खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत सुपेन ऊर्फ सुशांत बाळासाहेब चव्हाण (वय २६, रा. काळेपडळ, हडपसर – Kalepadal Hadapsar) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०४३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल संदीपान गायकवाड Amol Sandipan Gaikwad (वय ३४, रा. पांढरेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद – Bhum, Osmanabad) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काळेपडळ रेल्वे गेटजवळील (Kalepadal Railway Gate) ओम साई व्हिडिओ गेम अँड पोकर झोन (Om Sai Video Game & Poker Zone) दुकानात शनिवारी रात्री दहा वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांची पत्नी फिर्यादी याच्याबरोबर गेल्या दीड वर्षांपासून काळेपडळ येथे रहात आहे.
याचा अमोल गायकवाड याला राग होता. या रागातून तो शनिवारी रात्री काळेपडळला आला.
त्याने ओळख पटू नये, म्हणून तोंडाला रुमाल बांधून डोक्यावर टोपी घातली होती.
फिर्यादी सुशांत चव्हाण हा दुकानात असताना त्याने आत प्रवेश केला.
चव्हाण याच्या डोक्यावर, कानावर, हातावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Attempted murder by stabbing a young man in the head with a Koyta out of anger for abducting his wife

The post Pune Crime News | पत्नीला पळविल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article