Header

Pune Crime News | वाहन चोरी करणाऱ्या आतरराज्यीय अट्टल चोराला विमानतळ पोलिसांकडून अटक

Pune Crime News | वाहन चोरी करणाऱ्या आतरराज्यीय अट्टल चोराला विमानतळ पोलिसांकडून अटक

Pune Crime News | Criminals are arrested by viman nagar Police for stealing a vehicle

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या अट्टल चोरट्याला विमानतळ पोलीस ठाण्यातील (Viman Nagar Police Station) तपास पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 2 लाख 55 हजार रुपयांच्या 5 दुचाकी जप्त केल्या आहे. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) बर्मासेल लोहगाव परिसरात मंगळवारी (दि.25) रात्री केली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

योगेश संजय गालीकर Yogesh Sanjay Galikar (वय-26 रा. विजयनगर चौधरी पार्क, दत्तनगर दिघी, मुळ रा. मुपो साकेगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे (Pune Crime News) नाव आहे. कोम्बिंग ऑपरेशनच्या (Pune Police Combing Operation) अनुषंगाने विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलींग करत होते. त्यावेळी लोहगाव परिसरातील बर्मासेल (Barmasel Lohgaon) परिसरात एका संशयिताला सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन व पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

संशयिताकडे असलेल्या दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकी चोरीची असून आरोपीने विमानगर येथील सिग्नेचर हॉटेल (Signature Hotel) येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी 2 लाख 55 हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त करुन पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4 तर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथून 1 दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात मधील सुरत (Surat in Gujarat) येथे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior PI Vilas Sonde),
सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan), पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhavre),
पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ,
सचिन जाधव, सचिन कदम, ज्ञानेश्वर आवारी, सचिन जगदाळे यांच्या पथकाने केली.

Web Title :  Pune Crime News | Criminals are arrested by viman nagar Police for stealing a vehicle

हे देखील वाचा

The post Pune Crime News | वाहन चोरी करणाऱ्या आतरराज्यीय अट्टल चोराला विमानतळ पोलिसांकडून अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article