PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा 14 वा हप्ता आज मिळणार; राजस्थानमधून पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण

नवी दिल्ली : PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 14वा हप्ता आज (गुरूवार) शेतकऱ्यांच्या (PM Kisan Yojana) खात्यात जमा होणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. राजस्थानमधील (Rajasthan) सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे पीएम किसानचा 14 वा हप्ता (14th Installment ) वितरीत केला जाणार असल्याचे समोर आले आहे. ही माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे (Dileep Zende) यांनी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शेतकऱ्यांना (Farmer) निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये यांना 2 हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपये लाभ देण्यात येतो. 27 जुलै रोजी महाराष्ट्रातील (Maharashtra) 85 लाख 66 हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारणत: 1 हजार 866 कोटी 40 लाख रुपये इतका लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात (Bank Account) हस्तांतरित करण्यात येणार आहे.
काय आहे योजना –
पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकार (Central Government) दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते.
हे 6000 रुपये प्रत्येकी 4 महिन्याला 2000 रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढचा 14 हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु होती.
पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. आज (27 जुलै) रोजी पीएम किसानचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात
जमा होणार आहे.
Web Title : PM Kisan Yojana | today pm kisan samman nidhi yojana 14th installment will be
credited to farmers accounts pm modi rajasthan
हे देखील वाचा
Pune Crime News | वाहन चोरी करणाऱ्या आतरराज्यीय अट्टल चोराला विमानतळ पोलिसांकडून अटक
The post PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा 14 वा हप्ता आज मिळणार; राजस्थानमधून पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण appeared first on बहुजननामा.