Header

Pune News | हवाई दलाच्या विमानाने नागपूरहून अवघ्या मिनिटांत पुण्यात आणले मानवी हृदय; शस्त्रक्रिया यशस्वी

Pune News | हवाई दलाच्या विमानाने नागपूरहून अवघ्या मिनिटांत पुण्यात आणले मानवी हृदय; शस्त्रक्रिया यशस्वी

Pune News | human heart flown from nagpur to pune in iaf an 32 aircraft for transplant into male air warrior

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune News | पुण्यामध्ये काल (दि.26) एका जवानाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Heart Transplantation Surgery) पार पडली. यासाठी नागपूरहून (Nagpur) हवाई दलाच्या विमानामधून एक मानवी हृदय (Human Heart) पुण्याला (Pune News) आणण्यात आले. शहरातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (AICTS) येथे जवानाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. हे मानवी हृदय व्यवस्थितपणे आणण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर (Green Corridor) देखील तयार करण्यात आला होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) AN-32 विमानाने नागपूर ते पुणे हा 700 किलो मीटरचे अंतर पार केले. याद्वारे मानवी हृदय पाठवण्यात आले. हृदय नागपूरहून पुण्याला नेण्यासाठीचा उड्डाणाचा वेळ सुमारे 90 मिनिटे होता. शस्त्रक्रिया झालेला व्यक्ती हा 39 वर्षीय वायुसेनेचा जवान आहे. ग्रीन कॉरिडॉर आयएएफ वाहतूक पोलीस नागपूर आणि पुणे आणि एससी प्रोव्होस्ट युनिटकडून (SC Provost Unit) देण्यात आला होता. या ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयव प्रत्यारोपणासाठी जलद वितरण आणि अत्यावश्यक सेवा देण्यास मोलाची मदत होते. यासाठी वाहतूक विभागांतर्फे 60 ते 70 टक्क्यांपेक्षा कमी वेळेत अत्यावश्यक वस्तू पोहचती करु शकेल अशा पद्धतीची वाहतूक व्यवस्था तयार केली जाते.

वायुसेनेच्या जवानला हृदय देणारी महिला दाता ही शुभांगी (Shubhangi) 31 वर्षीय गृहिणी होती.
ही महिला नागपुरमध्ये पती आणि दीड वर्षांच्या मुलीसह राहत होती.
काही दिवसांपूर्वी शुभांगीला तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर 20 जुलै रोजी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिच्या मेंदूमध्ये ब्लड क्लॉट्स (Blood Clots In Brain) असल्याचे निदान झाले. काहीच दिवसांत ही महिला ब्रेन डेड झाल्याचे सांगण्यात आले. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) नागपूरचे समन्वयक दिनेश मंडपे (Dinesh Mandpe) यांनी महिलेच्या कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. तिच्या पतीच्या व भावाच्या संमंतीने चार गरजूवंतांना त्यांचे अवयव दान करण्यात आले. यामध्ये त्यांचे हृदय, यकृत व दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. यामध्ये हवाई जवानाला त्यांचे हृदय दान करण्यात आले असून, जवानाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यामध्ये (Pune News) यशस्वीरित्या पार पडली आहे.

Web Title : Pune News | human heart flown from nagpur to pune in iaf an 32 aircraft for transplant into male air warrior

Pune Crime News | कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय देणाऱ्यास ATS कडून अटक

The post Pune News | हवाई दलाच्या विमानाने नागपूरहून अवघ्या मिनिटांत पुण्यात आणले मानवी हृदय; शस्त्रक्रिया यशस्वी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article