Header

Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यांकडे पुन्हा दोन मोबाइल सापडले, 4 जणांवर FIR

Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यांकडे पुन्हा दोन मोबाइल सापडले, 4 जणांवर FIR

Pune Crime News | Yerwada jail again two mobiles found with inmates, FIR against 4

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडा मध्यवर्ती कारागृहातील (Yerwada Central Jail) कैद्यांकडे पुन्हा एकदा दोन मोबाइल (Mobile Phone), दोन बॅटऱ्या आणि एक सिमकार्ड (SIM Card) सापडले आहे. हा प्रकार 5 ऑगस्ट दुपारी साडेचार ते 6 ऑगस्ट दुपारी साडेचार च्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News) मागील काही महिन्यांपासून सातत्याने कारागृहात मोबाइल सापडत असल्याच्या घटना घडत आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी न्यायबंदी तालीम मोहम्मद खान, राजु तुकाराम अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप व आकाश उत्तम रणदिवे यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) कारागृह कायदा (Prison Act) 1894 नियम 42, 45 (12) आयपीसी 188, 120(ब), 34 नुसार मंगळवारी (दि.8) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुरुंगाधिकारी रेवनाथ कडू कानडे Jailor Revnath Kadu Kande (वय-54) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे 5 ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर असताना त्यांना न्यायबंदी तालीम खान हा मोबाईल वापरत असल्याची माहिती मिळाली. आरोपीला बोलावून घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात मोबाईल फोन बॅटरीसह लपवून ठेवल्याचे आढळून आले. तसेच 6 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान टिळक सेप्रेट खोली क्रमांक 30 मध्ये झडती घेण्यात आली. त्यावेळी न्यायबंदी राजू अस्वले याच्या अंगझडती मध्ये मोबाईल फोन बॅटरीसह व एअरटेल कंपनीचे सिमकार्ड लपवून ठेवल्याचे आढळून आले.

आरोपी राजु अस्वले, सचिन उर्फ पप्पू घोलप व आकाश रणदिवे यांनी संगनमत करुन येरवडा मध्यवर्ती कारागृहात
बाहेरुन आतमध्ये मोबाईल फोन घेऊन येऊन त्याचा वापर केला.
आरोपींनी कारागृह नियमांचा भंग केला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior PI Balkrishna Kadam),
पोलीस निरीक्षक कांचन जाधव (PI Kanchan Jadhav), पोलीस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे (PSI Surekha Gatade)
यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Yerwada jail again two mobiles found with inmates, FIR against 4

The post Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यांकडे पुन्हा दोन मोबाइल सापडले, 4 जणांवर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article