Header

Pune Crime News | पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime News | death threat to pm modi we will blow up prime minister narendra modi with bomb pune person was threatened on email

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime News) समोर आला आला आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून वेबसाईटवर (Website) कमेंट करून ही धमकी देण्यात आली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) IPC 505 (2), 506 (2) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक राजेश कृष्णाजी शेळके (Police Naik Rajesh Krishnaji Shelke) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 6 ऑगस्ट रोजी उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल तायाराम दुधाणे Rahul Tayaram Dudhane (रा. भूगाव ता. पिरंगुट) यांनी
पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) फोन करून सांगितले की त्यांना थ्रेड कॉल आहे.
दुधाणे हे एक वेबसाईट चालवतात. राहुल दुधाणे हे उपचारासाठी दिनानाथ हॉस्पीटलमध्ये (Deenanath Hospital)
असल्याने पोलिसांनी दिनानाथ हॉस्पिटल येथे जाऊन दुधाणे यांची भेट घेतली.

त्यावेळी त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर एक कमेंट आली असून त्यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांना सांगितले. ‘आय विल किल नरेंद्र मोदी’ असा उल्लेख करत धमकी देण्यात आली आहे. तसेच दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची विधानं कमेंटमध्ये करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण (PSI Ganesh Chavan) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | death threat to pm modi we will blow up prime minister narendra modi with bomb pune person was threatened on email

The post Pune Crime News | पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article