Header

Pune Crime News | तारण ठेवलेले सोने सोडवण्याच्या बहाण्याने व्यवसायिकासह फायनान्स कंपनीची 40 लाखांची फसवणूक, हडपसर येथील प्रकार

Pune Crime News | तारण ठेवलेले सोने सोडवण्याच्या बहाण्याने व्यवसायिकासह फायनान्स कंपनीची 40 लाखांची फसवणूक, हडपसर येथील प्रकार

Fraud

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | तारण ठवलेले सोन्याचे दागिने (Pledged Gold Jewellery) सोडवण्याच्या बहाण्याने व्यवसायिक आणि फायनान्स कंपनीची 40 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) हडपसर येथील मोहम्मदवाडी येथे जून 2023 ते जुलै 2023 दरम्यान घडला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याप्रकरणी व्यवसायिक प्रणंद दिनेश शहा Pranand Dinesh Shah (वय-35 रा, अॅमेनेरा पार्क टाऊन, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News) त्यानुसार पोलिसांनी संग्राम संभाजी नाईक Sangram Sambhaji Naik (वय-21 रा. वॉटराईज सोसायटी, उंड्री) याच्या विरुद्ध आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी प्रणंद शहा यांचे तिरुपति गोल्ड बायर्स (Tirupati Gold Buyers) नावाचे शॉप असून ते ग्राहकांनी तारण ठेवलेले
जुने सोडवून घेऊन त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. आरोपी संग्राम नाईक याने त्याचे 320 ग्रॅम वजनाचे
सोन्याचे दागिने ‘मनी टु मी’ (Money To Me) या सोने तारण कंपनीत ठेवले आहे. तारण ठेवून घेतलेल्या कर्जाचे
व्याज भरणे शक्य नसल्याचे सांगून आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 14 लाख रुपये घेतले.

तसेच चंद्रकांत सुरेश येरापल्ले (Chandrakant Suresh Yerapalle) यांच्या ‘इंडिया गोल्ड’ (India Gold) या
फायनान्स कंपनीची सबकंपनी ‘फ्लॅट व्हाईट कॅपिटल प्रा. लि.’ (Flat White Capital Pvt. Ltd.) यांच्याकडून
ही 26 लाख 5 हजार रुपये घेतले. आरोपीने दोघांकडून 40 लाख 5 हजार रुपये घेतले. मात्र, ही रक्कम परत न करता
तसेच सोन्याचे दागिने (Gold Ornaments) न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.
याबाबत फिर्यादी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
या अर्जची चौकशी करुन पोलिसांनी संग्राम नाईक याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

The post Pune Crime News | तारण ठेवलेले सोने सोडवण्याच्या बहाण्याने व्यवसायिकासह फायनान्स कंपनीची 40 लाखांची फसवणूक, हडपसर येथील प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article