Header

Pune Crime News | पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने 9 जणांची 25 लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार

Pune Crime News | पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने 9 जणांची 25 लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार

Cheating Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | ऑनलाईन टास्कमधून (Online Task) फसवणूक (Fraud) झाल्याचा आणखी एक प्रकार खराडी परिसरात उघडकीस आला आहे. पार्ट टाईम जॉब (Part Time Job) देण्याच्या बहाण्याने 9 जणांना ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून 25 लाख 65 हजारांची फसवणूक (Cheating Case) करण्यात आली. हा प्रकार (Pune Crime News) 17 जानेवारी 2023 ते 24 एप्रिल 2023 या कालावधीत घडला.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत खराडी येथील 36 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) शुक्रवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल क्रमांक धारक, टेलीग्राम आयडी (Telegram) धारक यांच्यावर आयपीसी 409, 419, 420, 34, आयटी अॅक्ट (IT Act) 66 (सी), 66(डी) प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह इतर 8 जणांची फसवणूक केली असून त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केले आहेत. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून पार्ट टाईम
जॉब असल्याचे सांगितले. पार्ट टाईम जॉब करता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक करण्यास सांगितले.
यानंतर वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे सांगून टेलिग्राम आयडी देऊन त्यांना जॉईन
होण्यास सांगितले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून
फिर्यादी यांच्यासह इतर 8 जणांकडून 25 लाख 65 हजार 204 रुपये उकळले.
काही कालावधीनंतर परतावा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत
तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior PI Rajendra Landge) करीत आहेत.

The post Pune Crime News | पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने 9 जणांची 25 लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article