Header

Pune Crime News | घरफोडी करुन सोन्याचांदीच्या दागिन्याबरोबर कार नेली चोरुन

Pune Crime News | घरफोडी करुन सोन्याचांदीच्या दागिन्याबरोबर कार नेली चोरुन

Pune Crime News | Burglary and theft of car along with gold and silver jewellery

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सोन्या चांदीचे दागिने चोरले. त्याचवेळी कारची चावी घेऊन पार्किंगमधील कारही चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका २४ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८४/२३) दिली आहे. हा प्रकार नर्‍हे येथील मल्हार प्राईड येथे शनिवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime News )

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. सोन्या चांदीचे दागिने चोरले़ घरातील टाटा टिआगो गाडीची चावी घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेली गाडी असा ५ लाख ९६ हजार ३०० रुपयांचा माल चोरुन नेला.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

फिर्यादी यांच्या शेजारचा फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. शहरात एकाच दिवशी चार ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले. कोंढव्यात कुलूप तोडून चोरट्यांनी किचनमधील स्टीलच्या डब्यातील १ लाख ९५ हजार रुपयांचे ४० ग्र्रॅमचे सोन्याचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम चोरुन नेली. आंबेगाव पठार येथील स्वामीनी हाईटमधील फ्लॅटचा दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी ४३ हजार ५०० रुपयाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. वडगाव येथील आदिश्री अपार्टमेंटमधील फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून चोरट्याने शुट, शर्ट रोख रक्कम असा ८५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.

 

Web Title :  Pune Crime News | Burglary and theft of car along with gold and silver jewellery

 

The post Pune Crime News | घरफोडी करुन सोन्याचांदीच्या दागिन्याबरोबर कार नेली चोरुन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article