Header

Pune Crime News | धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल; शेवाळवाडी चौकात गुंडांचा राडा

Pune Crime News | धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल; शेवाळवाडी चौकात गुंडांचा राडा

Pune Crime News | To do business we have to pay installments; Gangsters shout at Shewalwadi Chowk 

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | दुकानातून सामान घेऊन धंदा करायचा असेल तर आम्हला हप्ते द्यावे लागतील, नाही तर एकाएकाला त्यांच्या दुकानासोबत फोडून टाकू अशी धमकी देऊन तिघा गुंडांनी शेवाळवाडीत राडा घातला. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत हिराराम चेनाराम देवासी (वय ३४, रा. शेवाळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११८८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय साळुंके (वय २०), शुभम गवळी, सुदाम साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शेवाळवाडी येथील चैतन्य स्वीटससमोर (Chaitanya Sweets Shewalwadi) रविवारी दुपारी तीन वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शेवाळवाडीत चैतन्य स्वीटस हे दुकान आहे. ते दुकानात असताना तिघे गुंड दुकानात आले. अजय साळुंके याने पाणी बाटली, बाकरवडी तसेच रेड बुल ड्रिंक घेतले. फिर्यादी यांनी त्याचे पैसे मागितल्यावर ‘‘तुम्ही लोकं बाहेरुन येऊन येथे धंदा करता,

तुम्हाला येथे धंदा करायचा असेल तर, तुम्हाला आम्हाला प्रत्येक महिना ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,
नाही तुला व तुझे दुकान देखील फोडीन,’’ अशी धमकी दिली. त्यानंतर ते दुकानाबाहेर आले.
लोखंडी हत्यार हातात घेऊन ते हवेत फिरवून दहशत करीत मोठ्यमोठ्याने आरडाओरडा करीत शिवीगाळ करुन
‘‘येथे जर धंदे करायचे असतील तर प्रत्येकाने आम्हाला प्रत्येक महिन्याला हप्ते द्यावे लागतील,
नाही तर एकएकाला त्याच्या दुकानासोबत फोडून टाकू,’’ असे बोलून दहशत पसरवली.
सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे (Assistant Police Inspector Dabhade) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime News | To do business we have to pay installments; Gangsters shout at Shewalwadi Chowk

The post Pune Crime News | धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल; शेवाळवाडी चौकात गुंडांचा राडा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article