Header

Pune Crime News | येरवडा: तुझ्याशिवाय जगू शकणार नाही असे म्हणत शाळकरी मुलीवर बलात्कार

Pune Crime News | येरवडा: तुझ्याशिवाय जगू शकणार नाही असे म्हणत शाळकरी मुलीवर बलात्कार

Minor Girl Rape Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) एका १५ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) नरेश अण्णा धनगर Naresh Anna Dhangar (रा. ताडीवाला रस्ता) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५८९/२३) दिली आहे. हा प्रकार मे २०२३ मध्ये येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये घडला होता.

यााबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश धनगर याने या अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिला जाळ्यात ओढले. मोटारसायकलवरुन फिरायला जाण्याच्या बहाण्याने लक्ष्मीनगर येथील मित्राच्या रुमवर नेले. तेथे या मुलीला प्रपोज करुन तिला तुझ्याशी लग्न करणार आहे. तिच्याशिवाय जगू शकणार नाही, असे म्हणून तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले.
या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) धनगरने दिली होती.
मुलीच्या वडिलांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली होती.
हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्याने बंडगार्डन पोलिसांनी तो
येरवडा पोलीस ठाण्यात वर्ग केला असून पोलीस उपनिरीक्षक लिंगे (PSI Linge) तपास करीत आहेत.

The post Pune Crime News | येरवडा: तुझ्याशिवाय जगू शकणार नाही असे म्हणत शाळकरी मुलीवर बलात्कार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article