Header

Pune Crime News | कोंढवा: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास जाब विचारणाऱ्या आईला धमकी; रोड रोमिओविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime News | कोंढवा: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास जाब विचारणाऱ्या आईला धमकी; रोड रोमिओविरोधात गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍या तरुणाला जाब विचारल्याने रोड रोमिओने (Road Romeo) आईला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) रोड रोमिओवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

आकाश महेंद्र रोचवानी Akash Mahendra Rochwani (वय २४, रा. इंदिरानगर, महमंदवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत घुलेनगर येथील एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८७२/२३) दिली आहे. हा प्रकार कोरिथियन्स क्लबच्या गेटसमोर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १५ वर्षांची मुलगी क्लासमधून घरी येत होती.
रिक्षातून खाली उतरल्यावर आकाश रोचवानी याने तिला धक्का दिला.
तिच्या पायावर पाय देऊन तुझा नंबर दे, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे बोलला. ही मुलगी घाबरुन तेथून पायी घरी चालत जात असताना त्याने तिचा पाठलाग केला. ही बाब फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी विचारणा केली. तेव्हा त्याने तुम्ही माझेविरुद्ध पोलिसात तक्रार केली तर मी तुमच्याकडे बघून घेईल, असे म्हणून धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक शेख (PSI Shaikh) तपास करीत आहेत.

The post Pune Crime News | कोंढवा: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास जाब विचारणाऱ्या आईला धमकी; रोड रोमिओविरोधात गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article