Pune Pimpri Chinchwad Fire News | चिंचवडमधील दुकानाला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यु; एकाच कुटुंबातील चौघे, दोन मुलांचा समावेश

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Fire News | चिखली येथील पूर्णानगरमधील सचिन हार्डवेअर (Chikhali Purna Nagar Fire News) या दुकानाला पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यात दोन मुलांचा समावेश आहे. ही आग बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
चिंचवड येथील पूर्णानगर येथे सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. पहाटेच्या सुमारास या दुकानातून धुर येत असल्याची पाहून नागरिकांनी अग्निशामन दलाला माहिती कळविली. (Pune Pimpri Chinchwad Fire News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये पाण्याचा मारा करुन काही वेळातच आग विझवली. या आगीत दुकानातील चौघांचा होरपळून मृत्यु झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
शॉर्टशर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चिमणाराम चौधरी (वय ४५), ज्ञानुदेवी चौधरी (वय ४०),
सचिन चौधरी (वय १०) आणि भावेश चौधरी (वय १५) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
- हडपसर येथील तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
- केंद्राकडून गृहिणींना रक्षाबंधनचे खास गिफ्ट; घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त
- फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ, पतीसह पाच आरोपींविरुद्ध FIR; कोंढवा परिसरातील घटना
- पुणे: वारजे पोलिसांकडून दोघांना पिस्टलसह अटक, 7 काडतुसे जप्त
- मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती
- खंडोबा मंदिराचा गाभारा सोमवार पासून दीड महिना बंद, तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामे सुरु होणार
The post Pune Pimpri Chinchwad Fire News | चिंचवडमधील दुकानाला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यु; एकाच कुटुंबातील चौघे, दोन मुलांचा समावेश appeared first on बहुजननामा.