Header

Pune Police MCOCA Action | मंगला टॉकीज येथील खून प्रकरणातील सागर कोळानट्टी टोळीतील 19 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 55 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Pune Police MCOCA Action | मंगला टॉकीज येथील खून प्रकरणातील सागर कोळानट्टी टोळीतील 19 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 55 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Pune Police MCOCA Action

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | नितीन म्हस्के खून प्रकरणातील (Nitin Mhaske Murder Case) सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी व त्याच्या 19 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 55 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

मंगला टॉकिज येथुन गदर -2 (Gadar-2) चित्रपट पाहून घरी जात असताना नितीन म्हस्के आणि त्याच्या मित्रावर सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी टोळीने हल्ला करुन नितीन म्हस्केचा खून केला होता. आरोपींनी नितीन म्हस्के याच्या मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या व फरशीचे तुकडे मारुन खून केला होता हा प्रकार 16 ऑगस्ट रोजी घडला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) आयपीसी 302, 141, 142, 143, 144, 145, 147, 148, 149, 120(ब) सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख सागर उर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी (वय-35 रा. ताडीवाला रोड, पुणे), सुशील अच्युतराव सुर्यवंशी (वय-27), मल्लेश शिवराज कोळी (वय-24), मनोज विकास हावळे (वय-23), रोहन मल्लेश तुपधर (वय-23), शशांक उर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय-21), गुडगप्पा फकीराप्पा भागराई (वय-28), किशोर संभाजी पात्रे (वय-20), साहील उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय-20), गणेश उर्फ गमपत शिवाजी चौधरी (वय-24), रोहीत उर्फ मच्छी बालाजी बंडगर (वय-20), विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय-22), इम्रान हमीद शेख (वय-31) लॉरेन्स राजू पिल्ले (वय-36), आकाश सुनिल गायकवाड उर्फ चड्डी (वय-22), विवेक भोलेनाथ नवघरे (वय-25), अक्षय उर्फ बंटी विजय साबळे (वय-25), विनायक गणेश कापडे (वय-21), प्रदिप संतोष पवार (वय-21), सौरभ बाळु ससाणे (वय-20) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी टोळी प्रमुख सागर उर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन बेकायदेशीर मार्गाने फायदा करुन घेण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींनी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता खुन, गंभीर दुखापत, शस्त्र बाळगणे, दंगा करणे, मालमत्तेचे नुकसान, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, नागरिकांना मारहाण करुन जखमी करणे, शस्त्राचा धाक दाखवून दहशत पसरविणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)
(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव (Pune Police MCOCA Action) करण्याचा प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्त वसंत वामन
कुंवर (ACP Vasant Vaman Kunwar) यांनी परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त वसंत कुंवर करीत आहेत.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 55 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीपसिंह गिल,
सहायक पोलीस आयुक्त वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे
(Senior PI Dhanyakumar Godse), पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (PI Vikram Goud) ,
सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे (API Bholenath Ahivale), पोलीस अंमलदार मेमाणे, दिलीप नागर,
रोहित झांबरे यांच्या पथकाने केली.

The post Pune Police MCOCA Action | मंगला टॉकीज येथील खून प्रकरणातील सागर कोळानट्टी टोळीतील 19 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 55 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article