Header

Punit Balan Group | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टला प्रसाद वाटपासाठी ‘फूड व्हॅन’ भेट

Punit Balan Group | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टला प्रसाद वाटपासाठी ‘फूड व्हॅन’ भेट

Punit Balan Group

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Punit Balan Group | धनकवडी येथील सदगुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टच्यावतीने (Sadguru Shankar Maharaj Samadhi Trust) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU Pune) गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे. या प्रसाद वाहतुकीसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चे (Punit Balan Group) अध्यक्ष पुनीत बालन यांनी मठाला ‘फूड व्हॅन’ (Food Van) उपलब्ध करू दिली आहे. त्यामुळे प्रसाद वाटपाचे काम आणखी सोईस्करपणे होण्यास मदत होणार आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

‘श्री सदगुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट’च्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत प्रसाद वाटपाचा हा उपक्रम सुरु आहे. दररोज साधारणपणे बाराशे ते पंधराशे विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेतात. मात्र, या प्रसाद वाटपासाठी व्हॅनची सोय नसल्याने गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांनी तत्काळ प्रसाद वाटपासाठी व्हॅन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. दुर्गाष्टमीच्या मूहर्तावर उद्योजिका जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan) यांच्या हस्ते या व्हॅनच्या चाव्या ट्रस्टच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (BJP Rajesh Pandey) यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर (Surendra Waikar), सचिव सतीश कोकाटे (Satish Kokate), प्रताप भोसले (Pratap Bhosle) आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Punit Balan Group)

‘‘श्री सदगुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टच्यावतीने प्रसाद वाटपाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवला जातो.
त्यात या व्हॅनच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलून महाराजांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी ट्रस्टचे आभार व्यक्त करतो.’’

– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

The post Punit Balan Group | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टला प्रसाद वाटपासाठी ‘फूड व्हॅन’ भेट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article