Pune Crime News | वाढदिवसाचा केक न स्वीकारल्याने तरुणीला घरात घुसून मारहाण, एकतर्फी प्रेमातून तरुणाचे कृत्य; कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटी मधील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) एका तरुणाने तरुणीच्या वाढदिवसादिवशी तिच्या घरी कुरीयरने केक पाठवला. मात्र, तरुणाने केक न स्वीकारल्याने संतापलेल्या तरुणाने थेट तरुणीचे घर गाठले. त्याने तरुणीला घरात घुसून मारहाण (Beating) केली. याच दरम्यान तरुणाने तरुणीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग (Molestation) केला. हा प्रकार (Pune Crime News) उंड्री येथील एका उच्चभ्रू सोसायटीत (Elite Society) 24 ऑगस्ट रोजी रात्री घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 30 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अंकित सिंग Ankit Singh (वय-31 रा. केशवनगर, मांजरी रोड, आनंदनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 354 (ब), 354 (ड), 452, 352, 323 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने पीडित तरुणीच फोन नंबर घेऊन तिला कॉल करुन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याचा फोन नंबर ब्लॉक केला. यानंतरी तो वेगवेगळ्या नंबरवरुन तरुणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार मे 2022 पासून सुरु होता.
दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी तरुणीच्या वाढदिवसादिवशी (Birthday)
आरोपीने तिच्या घरी कुरिअरने केक पाठवला होता. मात्र, तिने तो केक स्वीकारला नाही.
याचा राग आल्याने आरोपीने थेट तरुणी राहत असलेल्या सोसायटीमध्ये गेला.
त्याठिकाणी सुरक्षारक्षकासोबत वाद घालून तो पीडितेच्या घरात घुसला. त्याने फिर्य़ादी तरुणीला हाताने मारहाण केली. या झटापटीत फिर्य़ादीच्या अंगावरील कपडे ओढले गेल्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न झाली. पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
- ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टला प्रसाद वाटपासाठी ‘फूड व्हॅन’ भेट
- भाडेकरुला कोयत्याने मारहाण, आईला अटक तर मुलगा ताब्यात; तळजाई वसाहत परिसरातील घटना
- पुण्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीची पावणे 2 कोटींची फसवणूक; प्रोजेक्ट डायरेक्टरसह चार जणांवर FIR
- एअर इंडियात सेटिंग! 40 टक्के सवलतीत विमान तिकीट मिळवून देण्याच्या आमिषाने इंजिनिअरची फसवणूक
- हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न, एकाला अटक तर 7 अल्पवयीन ताब्यात
The post Pune Crime News | वाढदिवसाचा केक न स्वीकारल्याने तरुणीला घरात घुसून मारहाण, एकतर्फी प्रेमातून तरुणाचे कृत्य; कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटी मधील घटना appeared first on बहुजननामा.