Header

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

Punit Balan At Dagdusheth Ganpati

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Punit Balan At Dagdusheth Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune ) विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन (Punitdada Balan) यांनी आज (मंगळवार) सपत्नीक ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या श्रींची आरती करून दर्शन घेतले. मानाच्या व प्रमुख गणपती मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सायंकाळी आरती करण्यात आली. यावेळी ‘दगडूशेठ’चे सर्व पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते. आरती केल्यानंतर ‘दगडूशेठ’च्या वतीने सरचिटणीस हेमंत रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुनीतदादा बालन यांचा सपत्नीक सत्कार करून गौरव केला. (Punit Balan At Dagdusheth Ganpati)

This image has an empty alt attribute; its file name is Punit-Balan-At-Dagdusheth-Ganpati-1-1024x682.webp

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Punit Balan At Dagdusheth Ganpati)

मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी व प्रशांत टिकार, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती मंडळाचे प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडित, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन, आर.एम.डी. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan), श्री जिलब्या मारुती गणपती मंडळाचे भूषण पंड्या यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

The post Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article