Header

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी अभुतपुर्व गर्दी झाली होती. गणेशोत्सवाचा 8 वा दिवस असल्याने दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रचंड गर्दी असताना देखील अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, मुंबई लोहमार्ग पोलिस दलाचे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्हयाचे माजी जिल्हाधिकारी आणि सध्या दिव-दमण येथे सचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. सागर डोईफोडे, दिग्दर्शक महेश लिमये, अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि गायिका सावनी रविंद्र यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन (Punit Balan) यांनी सर्व मान्यवरांना सन्मानित केले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि गायिका सावनी रविंद्र यांच्या उपस्थितीत अडीच हजार मुलींनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन’च्या समोर अथर्वशीर्ष पठण केले. त्यावेळी परिसरात पाय ठेवण्यास देखील जागा नव्हती. त्यामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुप्रसिध्द अशा ‘चिंतामणी म्युझिकल ग्रुप’च्या ‘लाईव्ह बेंजो’ने त्यांचे वाद सादर करण्यास सुरूवात केली. सायंकाळी साडे वात वाजेपर्यंत ‘चिंतामणी लाईव्ह बेंजो’चे वादन सुरू होते. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

हजारो भाविकांनी त्यांच्या वादनाचा मनसोक्त आनंद घेतला. शेकडो भाविकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘चिंतामणी लाईव्ह बेंजो’च्या वादानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले तर अनेकांनी सेल्फी काढून आनंद व्यक्त केला. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अभिनेत्री रकुल प्रित सिंग आणि सनदी अधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांचे भवनात आगमन झाले.

रकुल प्रित सिंग आणि डॉ. सागर डोईफोडे तसेच दिग्दर्शक महेश लिमये यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन यांनी त्यांचा सन्मान केला. डॉ. डोईफोडे यांनी सपत्नीक महाआरती केली. तासभराहुन अधिक काळ अभिनेत्री रकुल प्रित सिंगने ट्रस्टच्या परिसरात होती. अनेकांनी तिच्याबरोबर सेल्फी काढला. पुनीतदादा बालन यांच्याशी संवाद झाल्यानंतर तिने भाविकांना देखील संबोधित करून तिच्या गणेशोत्सवाबाबतच्या भावना सांगितल्या. आपल्याला बाप्पांच्या महाआरतीसाठी आमंत्रित केल्याबद्दल तिने पुनीतदादा बालन यांचे आभार मानले.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश आणि अभिनेता शरद केळकर यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली पण पावसात देखील भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरा मुंबई लोहमार्ग पोलिस दलाचे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांचे आगमन झाले. त्यांनी बाप्पांचे दर्शन घेतले. त्यांचा सत्कार पुनीतदादा बालन यांनी केला.

विसर्जन मिरवणूक सायं. 7 वाजता निघणार

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ची मिरवणूक गुरूवारी सायंकाळी 7 वाजता निघणार असल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मिरवणूकीत समर्थ पथक, रमणबाग पथक, श्रीराम पथक यांचा सहभाग असून मर्दानी खेळ देखील सादर करण्यात येणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन यांनी दिली आहे.

The post Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article