Header

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | फुलांची आकर्षक सजावट असलेल्या आणि कोल्ड फायरची विद्युत रोषणाई करणार्‍या पारंपरिक अशा मयूरपंख रथात विराजमान होऊन हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दिमाखदार मिरवणुकीने शुक्रवारी पहाटे विसर्जन झाले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune )

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

प्रथा परंपरेनुसार गुरूवारी सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींंना ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. 132 वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत असलेल्या रथाला आकर्षक असे मयुरपंख बसवून तो सजविण्यात आला होता. त्यावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या मयुरपंख रथात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली होती. ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर बाप्पा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला.

 

रात्री बारा वाजता टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. स्वत: पुनीत बालन (Punit Balan) यांनी या रथाचे सारथ्य केले होते. बेलबाग चौकात मयुररथ आल्यानंतर सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली. विसर्जन मिरवणुकीत या रथापुढे शिवाजीराजे मर्दानी पथकाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तर समर्थ, रमणबाग आणि श्रीराम पथक यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी होणारी फुलांची उधळण, रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली.

 

सकाळी सहा वाजता टिळक चौकात मयूररथ आल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne PMC) यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. सकाळी सव्वा सहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)

 

“दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. कमीत कमी वेळेत ही मिरवणूक संपविण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानुसार गतवर्षी कमी वेळेत मिरवणूक संपविली. या उत्सवात सेवा दिलेले पोलिस, महापालिका अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार!

– पुनीत बालन (विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट)
Punit Balan (Trustee and Head of Festivals, Shrimant Bhausaheb Rangari Trust)

The post Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article