Header

Punit Balan Group – Rutuja Bhosale | पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

Punit Balan Group – Rutuja Bhosale | पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

Gold Medal In Asian Games 2023

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Punit Balan Group – Rutuja Bhosale | आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक जमा झाले आहे. पुनीत बालन ग्रुपच्या रुतुजा भोसले हिने रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) समवेत टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक (Win Mixed Doubles Gold) पटकावले. (Punit Balan Group – Rutuja Bhosale)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

भोसले आणि बोपन्ना या भारतीय जोडीने अंतिम फेरीत तापेई जोडीचा 2-6, 6-3, 10-4 असा पराभव केला. या जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये भोसले आणि बोपन्ना या जोडीने शानदार पुनरागमन करत तापेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा 10-4 असा पराभव करत सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला.  त्यानंतर दोघांमधील निर्णय सुपर टाय ब्रेकमध्ये घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत 10-4 असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. (Punit Balan Group – Rutuja Bhosale)

पुण्याच्या ऋतुजा भोसले हीचा पुनीत बालन ग्रुपशी सहकार्य करार झाला आहे. या करारानुसार या ग्रूपकडून भोसले हिला खेळासाठीचे सर्वोतोपरी मदत केली जाते.

टेनिस सोडण्याचा विचार अन् बालन यांचे पाठबळ

वर्षभरापूर्वी वाढत्या खर्चाच्या आर्थिक विवंचनेमुळे ऋतुजा ही टेनिस सोडण्याच्या मनस्थितीत पोहचली होती. मात्र, पुनीत बालन ग्रुपने तिला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऋतुजा हिने पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर तिने आयटीएफ एकेरीचे एक आणि दुहेरीचे तीन जेतीपदे पटकवली. त्यांनंतर आता थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. केवळ पुनीत बालन ग्रुप यांच्या पाठबळामुळेच ऋतुजा या यशापर्यंत पोहचू शकली असल्याची भावना व्यक्त करत तिच्या कुटुंबियांनी पुनीत बालन यांचे आभार व्यक्त केले आहे.

आमच्या ग्रुपची खेळाडू ऋतुजा भोसले आणि तिचा सहकारी रोहन बोपन्ना या जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले याचा मनस्वी आनंद वाटतो. या जोडीने केवळ भारताचे नाव उज्वल केले आहे. ऋतुजा सारखी प्रतिभावंत खेळाडू पुनीत बालन ग्रुपशी जोडली आहे याचाही आम्हाला अभिमान वाटतो.

– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप (Punit Balan, President, Punit Balan Group)

The post Punit Balan Group – Rutuja Bhosale | पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article