Pune Crime News | दांडिया खेळताना दांडी लागल्याने धारदार शस्त्राने वार, धायरी येथील घटना; 3 सराईत गुन्हेगारांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | दांडिया खेळताना दांडी लागल्याच्या कारणावरून तीन सराईत गुन्हेगारांनी एकाला बेदम मारहाण (Beating) करत धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.22) रात्री पावणे अकराच्या सुमारास आर्यन स्कुल समोर नऱ्हे-धायरी रोडवर घडली आहे. याप्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांना सिंहगड पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अक्षय आनंद कांबळे (वय-25 रा. ऋतुजा अपार्टमेंट, नऱ्हे, धायरी) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गौतम वामन चव्हाण Gautam Vaman Chavan (वय-21 रा. समर्थनगर, हिंगणे), हेमंत पांडुरंग राठोड Hemant Pandurang Rathod (वय-21 रा. गणेशमळा, सिंहगड), ऋतीक दिलीप कांबळे Hrithik Dilip Kamble (वय-23) यांच्यावर आयपीसी 307,323, 504,34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय कांबळे आणि त्याचा मित्र आदित्य भोजने हे दांडिया खेळण्यासाठी गेले होते. दांडिया खेळत असताना भोजने याची दांडी गौरव चव्हाण याला लागली. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाले. हा वाद फिर्यादीने मिटवला, त्यानंतर अक्षय त्याच्या तोंडओळखीच्या मित्राच्या दुचाकीवरुन घरी जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग केला. (Pune Crime News)
धायरी रोडवरील आर के हॉटेल समोर आरोपी गौरव चव्हाण याने फिर्यादी अक्षयच्या डोक्यात काचेची बाटली मारुन
खाली पाडले. तसेच तुला आता मारुन टाकतो असे म्हणुन चव्हाण याने धारदार हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा
प्रयत्न केला. या घटनेत अक्षय कांबळे जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोकाशी (PSI Mokashi)
करीत आहेत.
- MCA Joins Hands With Punit Balan Group | एमसीएचा महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाला चालना देण्यासाठी पुनित बालन ग्रुपसोबत करार
- Punit Balan Group Felicitates Rituja Bhosle | पुनीत बालन ग्रुपच्या पाठीब्यामुळेच सुवर्णपदकाला गवसणी; ऋतुजा भोसले हिचे उद्गार (Video)
The post Pune Crime News | दांडिया खेळताना दांडी लागल्याने धारदार शस्त्राने वार, धायरी येथील घटना; 3 सराईत गुन्हेगारांना अटक appeared first on बहुजननामा.