Header

Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात धक्कादायक माहिती समोर ! पाटीलच्या ड्रायव्हरने गिरणा नदीत फेकले कोट्यावधीचे ड्रग्स; मुंबई पोलिसांकडून मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरु

Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात धक्कादायक माहिती समोर ! पाटीलच्या ड्रायव्हरने गिरणा नदीत फेकले कोट्यावधीचे ड्रग्स; मुंबई पोलिसांकडून मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरु

Drug Mafia Lalit Patil-Mumbai Police

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या (Drug Mafia Lalit Patil) ड्रग्स प्रकरणात मुंबई पोलिसाच्या (Mumbai Police) हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ (Sachin Wagh) याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर-ठेंगोडा गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात ड्रेग्स फेकल्याची माहिती मुंबई पोलिसांना वाघ याच्या चौकशीत समजली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने मध्यरात्रीपासून पाण्याखाली शोध मोहिम राबवली जात आहे. या शोध मोहिमेत पोलिसांच्या हाती मोठा ड्रग्सचा साठा लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Pune Drug Case)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

ड्रग्स माफिया ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ याच्याकडे मुंबई पोलिसांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गिरणा नदीच्या पात्रात ड्रग्स फेकल्याचे समोर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक लोहणेर-ठेंगोडा येथे पोहचले. पोलिसांच्या पथकासोबत रायगड येथील प्रशिक्षित स्कुबा डायविंगचे पथक होते. नदीमध्ये प्लॅस्टिच्या गोण्यात एमडी ड्रग्स पावडर फेकून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नदी पात्रात शोध मोहिम सुरु केली. येथील डोंगराच्या भागात लपवून ठेवलेले एमडी ड्रग्स पोलिसांना शोधून काढण्यात यश आले आहे. यासंदर्भात अंधेरी साकीनाका पोलिसांनी नाशिक ग्रामीणच्या देवळा पोलीस ठाण्याला माहिती दिली आहे. यावेळी स्थानिक पोलिसांनी मुंबई पोलिसांना मोठा बंदोबस्त पुरवला आहे. (Pune Drug Case)

गिरणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स नष्ट केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी नदीपात्रातून ड्रग्स शोधण्यासाठी काही वॉटरप्रूफ कॅमेऱ्यांचाही वापर केला आहे. याशिवाय बोटीमध्ये बसून संपूर्ण नदीपात्र पिंजून काढला जात आहे. या कारवाईबाबत मुंबई पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मुंबई पोलीसांनी मंगळवारी (दि.22) मध्यरात्रीपासून मोठी कारवाई नाशिकमध्ये सुरू केली आहे.

गोण्यांमधून ड्रग्स नदीत फेकले

मुंबई पोलिसांनी सचिन वाघ याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दोन गोण्यामधून सुमारे 50 किलो ड्रग्स नदी पात्रात फेकल्याचे सांगितले.
कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाण्यात ड्रग्स शोधले जात आहे.
नदी पात्रात साधारण 15 ते 20 फूट खोल पाणी असल्याने ड्रग्सचा साठा अद्याप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
तर जवळच असणाऱ्या सरस्वती वाडी भागातून 15 किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कोट्यवधी रुपयांच ड्रग्स नष्ट करण्याचा प्रयत्न सचिन वाघ याने केला आहे.

Pune Crime News | दांडिया खेळताना दांडी लागल्याने धारदार शस्त्राने वार, धायरी येथील घटना; 3 सराईत गुन्हेगारांना अटक

The post Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात धक्कादायक माहिती समोर ! पाटीलच्या ड्रायव्हरने गिरणा नदीत फेकले कोट्यावधीचे ड्रग्स; मुंबई पोलिसांकडून मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरु appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article